विद्यार्थ्यांनी घेतली तंबाखू व्यसनमुक्तीची शपथ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 16 July 2019

राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, महाराष्ट्र शासनाने तंबाखू व्यसनमुक्तीसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

राजुरा : श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने तंबाखू व्यसनमुक्तीसाठी सामुहिक शपथ हा कार्यक्रम घेण्यात आला. तंबाखू व्यसनमुक्तीची शपथ रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की यांनी दिली.

या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मेघा नलगे, उपप्राचार्य डॉ. खेरानी यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.

तंबाखूमुक्त युवा यासंकल्पनेवर आधारित देशातील युवा वर्ग तंबाखूपासून दूर राहून निरोगी असायला हवा. जेणेकरून हीच युवाशक्ती देशाच्या विकासासाठी कामी येईल यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, महाराष्ट्र शासनाने तंबाखू व्यसनमुक्तीसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News