एसटीसाठी विद्यार्थी रस्त्यावर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 16 July 2019

मारडा : कोरपना तालुक्यातील निमणीमार्गे बससेवा सुरू करावी, या मागणीलासाठी सोमवारी (ता. १५) शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. राजुरा आगारासमोर त्यांनी एक तास बस रोखून धरली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत आगारप्रमुखांनी बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

निमणी परिसरातील हिरापूर, नींबाळा, धुनकी, लखमापूर येथील शेकडो विद्यार्थी्, महात्मा गांधी विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय, शरदराव पवार महाविद्यालयात शिक्षणासाठी जातात. मात्र, सकाळी सहा आणि दुपारी बारा वाजता कुठलीही बसफेरी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज पन्नास रुपये खर्च करून ऑटोने गडचांदूर जातात. बससेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.

मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे उपसरपंच उमेश राजूरकर, मारोती कोडापे, माजी उपसरपंच अनिल जगताप, आसिङ्क सय्यद, प्रफुल काळे, अशोक पोतराजे, सावरकर, लीगाजी चदेकर, विशाल टेमुडे , अमित जगताप, मगेश तिखट, नीलेश मडावी, किसन सावरकर, जगताप, कल्पना चादेकर, सुशीला कारेकर, मडपल्लीवर, रिता पाटील यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी राजुरा बसआगार गाठले. बससेवा सुरू करण्यासाठी संतप्त नागरिकांनी एक तास बस रोखून धरली. पोलिस निरीक्षक प्रमोद मडामे यांनी मध्यस्थी केली. एसटी विभागाच्या अधिका-यांनी आंदोलक विद्यार्थ्यांनी नियमित बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News