विद्यार्थ्यांनी ध्येय निश्‍चित करावे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 July 2019
  • विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे. ध्येय निश्‍चितीनंतर जिद्द, चिकाटीने योग्य दिशेला वाटचाल करावी.

अमळनेर : विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे. ध्येय निश्‍चितीनंतर जिद्द, चिकाटीने योग्य दिशेला वाटचाल करावी. यशोशिखरावर गेल्याशिवाय आपण राहत नाही, असे मत निवृत्त अप्पर पोलिस आयुक्त साहेबराव पाटील यांनी केले.  वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे दहावीत ८० टक्क्यांच्या वर व बारावीत ७५ टक्क्यांच्या वरील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभप्रसंगी ते बोलत होते. उमविचे माजी कुलगुरू शिवाजी पाटील अध्यक्षस्‍थानी होते. पोलिस निरीक्षक अंबादास मोरे, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर, खानदेश शिक्षण मंडळाचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, मुंबईचे निंबा पाटील, चोपड्याचे जीवन चौधरी, आनंद कंखरे, विजयसिंग पवार, उमेश काटे, सुनील महाले, डी. पी. बोरसे आदी उपस्थित होते.

उद्योगरत्न म्हणून प्रताप साळी, विजय पाटील, नीलेश पाटील, योगेश पाटील यांना तर वृक्षमित्र पुरस्कार तुळशीराम भदाणे, पक्षीमित्र पुरस्कार सुनील भोई यांना सन्मानित करण्यात आले  स्पर्धा परीक्षेत यश मिळविणारे विक्रीकर निरीक्षक स्वप्नील वानखेडे, कर सहायक संदीप पाटील, कर सहायक हर्षा पाटील, नियोजन अधिकारी विनोद धनगर, ऋतुजा पाटील, भावना पाटील यांच्यासह नवीनच पीएसआय म्हणून निवड झालेले पोलिस शरद पाटील तसेच पाडळसरे धरण संघर्ष समिती सदस्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष सुभाष चौधरी १६ ते १७ वर्षांपासून हा कार्यक्रम जागृत वर्णेश्वर महादेव मंदिरावर करत असतात. तसेच  प्रत्‍येक वाढदिवसाला  वृक्षारोपणही केले जाते. यावेळी साहेबराव पाटील, निंबा पाटील, विजयसिंग पवार, हर्षा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्‍थित होते. चंदूसिंग परदेशी, प्रवीण पाठक, संजय शुक्ल, नाना पाटील, सुनील पवार, गोरख पाटील, भावना पाटील आदींनी सहकार्य केले. वसुंधरा लांडगे, रणजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. जगन पाटील यांनी आभार मानले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News