भारतीय संविधानाची मुल्ये विद्यार्थ्यांनी अंगीकारावी: समतादूत खंडू फोले 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 9 November 2019

किनवट: "समता, स्वतंत्र्य, न्याय, बंधुभाव आणि धर्मनिरपेक्ष ही भारतीय संविधानिक मुल्ये विद्यार्थ्यांनी अंगीकारावी व स्वत:मध्ये बदल घडवुन आणावा आणि विकास करून घ्यावा" असे मत बार्टीचे समतादूत खंडू फोले यांनी व्यक्त केले.
 
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कै. श्री. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्रातील समाजकार्य क्षेत्रकार्याच्या प्रशिक्षणार्थिनी 'विद्यार्थी प्रवेश दिन' कार्यक्रम शुक्रवारी (ता.8) आयोजित केला होता. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेचे समतादूत फोले बोलत होते. 

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थांच्या वतीने समिक्षा सावंत, रूकसार ईमरान चौस, रवी सालेवाड आणि निकीता चव्हाण यांनी केले.
 
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशिक्षणार्थी दिक्षा ओंकार यांनी केले तर मान्यवरांचे तसेच उपस्थितांचे आभार अपर्णा हैबतकर यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
 
"आता समाजात गुणवान विद्यार्थांची उणिव जाणवत आहे. ती भरून काढण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेबांसारखा अभ्यास करण्याची गरज आहे."
-डॉ. शिवाजी गायकवाड, समन्वयक, कै. श्री. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र.

"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थी दशेपासून ज्ञानाची भुक होती. ती भुक भागविण्यासाठी त्यांनी अभ्यासरूपी गोळी घेतली. म्हणून ते भारतीय संविधानाचे निर्माते ठरले. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अभ्यासरूपी गोळी खावी" 
- संजय मरडे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News