येथे सुटतील विद्यार्थ्यांचे प्रश्न

गजेंद्र बडे
Saturday, 26 January 2019

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध स्तरातील लोकांसाठी विविध संघटना कार्यरत असतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात संघटना काम करत आहेत. पुण्यातही दोन महत्वाच्या संस्था आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत आहेत. जाणून घेऊया त्यांची माहिती थोडक्यात..

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध स्तरातील लोकांसाठी विविध संघटना कार्यरत असतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात संघटना काम करत आहेत. पुण्यातही दोन महत्वाच्या संस्था आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत आहेत. जाणून घेऊया त्यांची माहिती थोडक्यात..

1) छात्रभारती विद्यार्थी संघटना
विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडवावयाचे, या हेतूने छात्रभारती या समतावादी विद्यार्थी संघटनेची स्थापना झालेली आहे. विज्ञानयुगातील विद्यार्थ्यांची समतावादी संघटना, असे या विद्यार्थी संघटनेचे ब्रीद वाक्‍य आहे. आपले प्रश्‍न आपणच सोडवू, छात्रभारतीत सामील व्हा, या घोषवाक्‍याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संघटनेत सामावून घेतले जाते. गेल्या तीस वर्षांपासून ही संघटना कार्यरत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसली तरी समतावादी विचारांची ही संघटना आहे. संघटनेच्या राज्य, विभाग, विद्यापीठ, जिल्हा, तालुका आणि महाविद्यालय पातळीवर कार्यकारिणी स्थापन करण्यात आलेल्या आहेत. आमदार कपिल पाटील हे या संघटनेचे सल्लागार आहेत. सध्या संगमनेर (जिल्हा नगर) येथील दत्ता ढगे हे या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

2) स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय.)
स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ. आय.) ही देशपातळीपासून महाविद्यालयीन पातळीपर्यंत कार्यरत असलेली विद्यार्थी संघटना आहे. ही मार्क्‍सवादी कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची विद्यार्थी संघटना आहे. देशभरातील विद्यार्थी एकत्र आणून त्यांचे प्रश्‍न सोडविण्याच्या उद्देशाने या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. सद्यःस्थितीत देशभरात पाच लाखांहून अधिक तर, महाराष्ट्रात ७० हजारांहून अधिक या संघटनेचे सदस्य आहेत. देश, राज्य, विद्यापीठ, विभाग, जिल्हा, तालुका आणि महाविद्यालय पातळीवर या संघटनेच्या शाखा कार्यरत आहेत. देशातील सर्वांत मोठी विद्यार्थी संघटना अशी या संघटनेची ओळख आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News