मलेरियाच्या जनजागृतीसाठी पुढे सरसावले एन.एस.एस.च्या विद्यार्थी

प्रतिक पारधे
Sunday, 14 July 2019

चेंबूर येथील विवेकानंद एजुकेशन सोसायटी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स मधील एन.एस.एस.च्या संघाने 11 जूलै 2019 रोजी मलेरिया रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीचे प्रमुख उद्दीष्ट होते की समाजामधील लोकांना मलेरिया या आजाराबद्दल जागरुक करणे व त्यापासून वाचायचे उपाय कोणते हे सांगणे.

सकाळी 11 वाजता रॅली सुरू झाली. संघांमधील काही स्वयंसेवकांनी मलेरिया रॅली साठी काही आकर्षक चित्रे बनवली होती ज्याच्यामुळे मलेरिया या रोगापासून वाचायचे कसे हे लोकांना लवकर समजण्यास मदत झाली. या कार्यक्रमात एन. एस. एसच्या प्रोग्रॅम ऑफिसर मिसेस सुनिता चौधरी व कमिटी मेंबर मिस्टर कुणाल शेलार यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. 

ह्यावेळी 101 एन. एस. एस. चे विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. ही रॅली कॉलेजच्या आसपासच्या मोठया परिसरात झाली व ह्या रॅलीमुळे जवळपास 300 हून अधिक लोकांना फायदा झाला. 

रॅली दुपारी 12 वाजता यशस्वीरीत्या संपन्न झाली.

युवा पिढीला हाताशी घेऊन जग बदलण्यासाठी एन. एस. एस. नेहमी कार्यरत राहिले आहे आणि हे काम ते करत राहणार असा त्यांचा पन आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News