ग्रामीण भागात नियमित बस सेवेसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा

दौलत कणबरकर, बेळगाव
Wednesday, 20 November 2019

बेळगाव (कर्नाटक) : ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी दररोज शहरात शिक्षण घेण्यासाठी येतात, पण अनियमित बस सेवेचा फटका वारंवार विध्यार्थ्यांना बसत आहे. ग्रामीण भागातील बस सेवा नियमित ठेवा या मागणीसाठी बेळगाव पश्चिम भागातील विद्यार्थी तसेच पालकवर्गांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला.

बेळगाव (कर्नाटक) : ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी दररोज शहरात शिक्षण घेण्यासाठी येतात, पण अनियमित बस सेवेचा फटका वारंवार विध्यार्थ्यांना बसत आहे. ग्रामीण भागातील बस सेवा नियमित ठेवा या मागणीसाठी बेळगाव पश्चिम भागातील विद्यार्थी तसेच पालकवर्गांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला.

सोमवारी (ता.18) डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून अनेक विद्यार्थ्यांनी अनियमित बस सेवेच्या विरोधात घोषणाबाजी करत मोर्चाला सुरुवात केली. तब्बल 1 तासाहून अधिक वेळ कार्यालयासमोर विध्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर निवासी जिल्हाधिकारी बसवराज हटगुंडी यांनी निवेदन स्वीकारलं; पण विद्यार्थ्यांनी वायव्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलवून निवेदन स्वीकारण्याची मागणी केली अन्यथा हे आंदोलन असेच चालू ठेवू असा इशारा विध्यार्थ्यांनी दिला. 

शेवटी वायव्य परिवहन विभागीय मंडळाचे अधिकाऱ्यांनी येऊन निवेदन स्वीकारले आणि आठ दिवसांत नियमित बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले.
 येत्या आठवड्याभरात बेळगुंदी, उचगाव, येळ्ळूर आणि कडोली भागात सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी चार ते सहा यावेळेत जास्त बस सोडण्याचे आश्वासन देखील अधिकाऱ्यांनी दिले. 

ग्रामीण भागात पाठवल्या जाणाऱ्या मोडक्या बसबद्दल आरोप केला असता जानेवारी महिन्यात नवीन बस सुरू करण्यात येईल असे आश्वासनदेखील अधिकाऱ्यांनी दिले आहे.
 जर या आश्वासनांकडे दुर्लक्ष केल्यास गावगावांमध्ये बससाठी रास्तारोको करू असा इशारा अंदोलक विद्यार्थ्यांनी केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News