विद्यार्थी, कोल्हापूर युनिव्हर्सिटीचे आणि डब्बे बाहेरच्या खानावळीचे...

सुरज पाटील (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

देशात शिक्षणाच्या बाबतीत सर्वोत्तम शिखरावर असलेले विद्यापीठ म्हणजे कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ. क्रिडा, संस्कृती, मनोरंजन, शैक्षणिक क्षेत्र, अशा अनेक क्षेत्रांच गरुड झेप घेणारं विद्यापीठ म्हणून शिवाजी विद्यापीठाकडे पाहिलं जातं; मात्र याच विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या आणि तेथील वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केल्यास विद्यापीठ कुठे तरी मागे आहे का ? असाच प्रश्न निर्माण होतो...

देशात शिक्षणाच्या बाबतीत सर्वोत्तम शिखरावर असलेले विद्यापीठ म्हणजे कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ. क्रिडा, संस्कृती, मनोरंजन, शैक्षणिक क्षेत्र, अशा अनेक क्षेत्रांच गरुड झेप घेणारं विद्यापीठ म्हणून शिवाजी विद्यापीठाकडे पाहिलं जातं; मात्र याच विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या आणि तेथील वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केल्यास विद्यापीठ कुठे तरी मागे आहे का ? असाच प्रश्न निर्माण होतो...

विद्यापीठात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या किंवा पदवीधर आणि पद्यूत्तरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवनाबद्दल काय, असा प्रश्न विचारल्यास, त्याचे उत्तर खानावळ म्हणून मिळेल. कारणही अगदी तसच आहे...

दर संध्याकाळी ७ ते रात्री ९ वाजताच्या सुमारास कोल्हापूर विद्यापीठाच्या OUT आणि IN गेटवर उभा राहिल्यास, खानावळीतून आलेल्या डब्ब्यांची देवाण-घेवाण होताना आपल्याला पाहायला मिळते. खाणावळीतून आलेले डब्बे विद्यार्थी घेतात आणि तेथेच असलेल्या फूटपाथवर किंवा गेटच्या शेजारी असलेल्या बगीचामध्ये जेवायला बसतात.

कोल्हापूर शहर हे संस्कृतीचा वारसा जपणारं शहर म्हणून ओळखलं जातं. त्या संस्कृतीत कोल्हापूर विद्यापीठाचेदेखील तितकेच महत्व आहे. मात्र जुना पुणे- बेंगलोर महामार्गावर वसलेल्या शिवाजी युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी त्याच महामार्गाच्या कडेला असलेल्या फूटपाथवर बसून डब्बे खात असताना आपल्याला पाहायला मिळतात. 

उन्हाळ्याच्या दिवसात जरी कोणता त्रास नसताना हे विद्यार्थी खानावळीतून आलेले जेवन खात असले तरी पावसाळ्यात त्यांचा ठिकाणा काय ? हा प्रश्नदेखील त्या विद्यार्थ्यांच्या समोर उभा आहे.

ज्यावेळी तेथे बाहेरच्या खाणावळीचे डब्बे का येतात ? या प्रश्नांचं उत्तर घेण्यासाठी आम्ही गेलो, त्यावेळेला समजलेली कारणे पुढीलप्रमाणे ...

ही आहेत कारणे...

  • युनिव्हर्सिटीच्या कॅन्टीनचे जेवण काही विद्यार्थ्यांना पसंत नाही.
  • आत विद्यापीठाची मेस असूनदेखील तेथील जेवन विद्यार्थ्यांना न परवडल्याने आणि विद्यार्थ्यांच्या मते जेवनाचा दर्जा योग्य नसल्याने विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या बाहेरच्या खाणावळींचा शोध घ्यावा लागतो.
  • काही विद्यार्थ्यांची घरे जवळ असूनही आणि त्यांना गरज नसतानादेखील ते विद्यार्थी विद्यापीठात जेवन करत असतात, त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
  • तेथे शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांसाठी किंवा बाहेरून अभ्यास करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी जेवनाची व्यवस्था नाही.
  • अभ्यास करत असताना, लक्ष नसल्याने विद्यार्थ्यांना कॅन्टीनच्या वेळेत जाता येत नाही.

काय करता येईल...
शिक्षणाचा दर्जा सर्वोत्तम पातळीवर असूनदेखील विद्यार्थ्यांच्या जेवनाच्या बाबतीत विद्यापीठाकडून तडजोड करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बाहेरच्या खानावळीचे जेवन विद्यापीठात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कितपत योग्य आहे, हे पाहाने तितकेच महत्वाचे आहे.

विद्यापीठात अभ्यास करण्यासाठी आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी विद्यापीठाकडून कमी किंमतीत जेवनाची व्यवस्था करावी.
मेस अथवा कॅन्टीनच्या जेवनाच्या दर्जाकडे लक्ष द्यावे, जेणेकरून विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला बाहेरच्या खानावळीचा आधार घेण्याची गरज पडणार नाही...

जेवनाच्या बाबतीत एका बड्या युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने कोल्हापूर युनिव्हर्सिटीचा आधार घेत असतात, मात्र चक्क कोल्हापूर युनिव्हर्सिटीकडून त्यांची चेष्टा-मस्करकी होत असल्याचे दिसत आहे. युनिव्हर्सिटीच्या टीमने याकडे लक्ष देऊन ही परिस्थिती सुधारावी, असं इथल्या विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News