अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरभरती मेळावा, ११० विद्यार्थ्यांना बोलावले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019

यावेळी औरंगाबादच्या २३ नामांकित कंपन्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या. यात प्रामुख्याने १२ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

औरंगाबाद - जीआयझेड, एमएसएमई, मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे (मासिआ) वाळूज येथील कार्यालयात बुधवारी (ता.२६) सकाळी दहा वाजता जीआयझेडच्या प्रोजेक्‍टमध्ये सहभागी विद्यार्थ्यांसाठी नोकरभरती मेळावा घेण्यात आला. अभियांत्रिकी
महाविद्यालयाच्या मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्‍ट्रिकल, आयटी, कॉम्प्युटर, मेकॅनिकल डिझाईन/क्वालिटी आणि सीएनसी प्रोडक्‍शन आदी विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी मासिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजाळे, जीआयझेडचे तसव्वर अली, महात्मा गांधी मिशनच्या जेएनईसी महाविद्यालयाचे प्रोफेसर सरफराज अली कादरी व शिवकृष्णा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 
एवढ्या मोठ्या प्रमाणात मासिआ आणि जीआयझेडने नोकरी मेळाव्याचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

यावेळी औरंगाबादच्या २३ नामांकित कंपन्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या. यात प्रामुख्याने १२ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील ११० विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रियेसाठी बोलविण्यात आले. या भरती मेळाव्यासाठी मासिआचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज शहा, सचिव अर्जुन गायकवाड, प्रसिद्धिप्रमुख अब्दुल शेख, उद्योगसंवादचे अनिल पाटील, सर्जेराव साळुंके आदींची उपस्थिती होती, असे प्रसिद्धिप्रमुख अब्दुल शेख आणि भगवान राऊत यांनी कळविले. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News