दाखला मिळत नसल्याने विद्यार्थी अडचणीत; जनएकता संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सुशांत सांगवे
Monday, 22 July 2019

लातूर : राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची २०१८-१९ या वर्षाची शिष्यवृत्ती अद्याप विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. त्यामुळे शुल्क भरल्याशिवाय शाळा-महाविद्यालय सोडल्याचा दाखल मिळणार नाही, असे शिक्षण संस्थांतर्फे विद्यार्थ्यांना सांगितले जात असल्याने हजारो विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने ही दिरंगाई दूर करावी, अशी मागणी विद्यार्थी-पालकांबरोबरच वेगवेगळ्या संघटनांकडून होत आहे.

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना थकित शिष्यवृत्ती तातडीने मिळावी म्हणून महाराष्ट्र जनएकता संघटनेने दोनच दिवसांपूर्वी गांधी चौकात धरणे आंदोलन केले होते. यात अनेक विद्यार्थीही सहभागी झाले होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री सुरेश खाडे हे लातूर दौऱ्यावर आल्यानंतर त्याची भेट घेऊन संघटनेने त्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतले. मुख्यमंत्र्यांचे खासगी स्वीयसहाय्यक अभिमन्यू पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांनांही संघटनेने निवेदन दिले. थकित शिष्यवृत्ती तत्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली.

यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष इरफान शेख म्हणाले, अल्पसंख्यांक खात्यामार्फत मुस्लिम, पारसी, ख्रिश्चन या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांच्या तंत्रशिक्षण, अभियांत्रिकी, वैद्यकीय यासह बारावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांसाठी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती सरकारतर्फे दिली जाते. विद्यार्थ्यांनी नियमाप्रमाणे मागील वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये अर्ज भरले. जुलै महिना संपत आला तरी विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळाली नाही. पूर्वी पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती दिली जात होती. ती सरकारने गेल्या काही वर्षांपासून बंद केली आहे. ती पून्हा सुरू करावी, अशीही आमची मागणी आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News