अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड

विवेक मेतकर
Tuesday, 18 June 2019
  • महानगरांमधील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी विज्ञान प्रवेशसाठी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 
  •  केंद्रीय प्रवेश समितीकडून पहिल्या दिवशी 1100 माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले.
  • प्रवेश प्रक्रियेचा अर्ज कम्प्युटर सेंटरवर भरण्यासाठी विद्यार्थी किंवा त्याचा पालक उपस्थित असणे आवश्यक आहे. 

अकोला: महानगरांमधील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी विज्ञान प्रवेशसाठी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय प्रवेश समितीकडून पहिल्या दिवशी 1100 माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले. परंतु 55 कॉलेज व 5860 जगांचा पर्याय उपलब्ध असताना प्रवेश अर्ज भरताना केवळ विकास महाविद्यालयाचा पर्याय निवडणार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू शकतो. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा अर्ज कम्प्युटर सेंटरवर भरण्यासाठी विद्यार्थी किंवा त्याचा पालक उपस्थित असणे आवश्यक आहे. 

त्याशिवाय स्वीकारू नये, दहावी उत्तीर्ण खंड असलेल्या विद्यार्थ्यांची बेस्ट फाइव ची टक्केवारी अर्जात नमूद करावी, अर्जात विद्यार्थ्यांना 55 महाविद्यालयांच्या पर्याय उपलब्ध आहे. एकच पर्याय दिल्यास प्रवेशात अडचणी निर्माण होऊ शकतात. एकाच विद्यार्थ्याकडून एकापेक्षा जास्त अर्ज स्वीकारण्यात येऊ नये. अशा प्रकारच्या सूचना संगणकीय स्वीकृती केंद्र संचालकाला देण्याचा निर्णय केंद्रीय प्रवेश समिती कडून घेण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद आगरकर महाविद्यालय स्टेशन रोड येथे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जाच्या वितरणाचा प्रारंभ समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News