शिक्षकासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019
  • शाळेलाही ठोकले कुलूप; शालेय व्यवस्थापन समितीसह पालकांचा सहभाग

अर्जुनी मोरगाव - मोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक देण्यात यावे, वर्गखोल्यांची दुरुस्ती किंवा नवीन बांधकाम करण्यात यावे या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी सोमवारी शाळेला कुलूप ठोकले. त्यानंतर घोषणा देत पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह  विद्यार्थ्यांचे पालक सहभागी झाले होते.

मोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. जुन्या वर्गखोल्या पाडून ५ नवीन खोल्यांचे बांधकाम झाले. पुन्हा  दोन वर्गखोल्यांची गरज असताना याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे. शिवाय आठ वर्गांसाठी मुख्याध्यापकांसह सहा शिक्षक असल्याने नेहमी तीन वर्ग वाऱ्यावर असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

हे नुकसान होऊ नये म्हणून दोन शिक्षकांची मागणी शिक्षण विभागाकडे करण्यात आली. परंतु, दीर्घ कालावधीपासून ही मागणी रेंगाळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आज शाळेला कुलूप ठोकून पंचायत समितीसमोर ठिय्या मांडला. पंचायत समिती सभापती शिवणकर, गटविकास अधिकारी अंदेलवाड, गटशिक्षणाधिकारी शिरसाटे यांनी एका सहायक शिक्षकाची तात्पुरती नियुक्ती केल्याचे पत्र शालेय व्यवस्थापन समितीला दिले. हे शिक्षक २६ जुलैपासून रुजू होतील, असेही सांगितले. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

जीर्ण वर्गखोल्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे
या शाळेच्या वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून, याबाबतचा प्रस्ताव ८ जुलैला जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. यावर लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल, असे पंचायत समितीकडून सांगण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुनेश्‍वर शहारे, क्षीरसागर 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News