शैक्षणिक पासअभावी विद्यार्थीचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019
  • अहल्याबाई होळकर योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यासाठी मोफत बस पास योजना
  • मात्र, शैक्षणिक सत्रात बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना अजूनही पासेस मिळेना
     

राजुरा : शासनाच्या मानव विकास मिशनतून अहल्याबाई होळकर योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यासाठी मोफत बस पास योजना आहे. मात्र, शैक्षणिक सत्रात बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणा-या विद्यार्थिनींना अजूनही पासेस मिळाले नाहीत. त्यामुळे पालकांवर आर्थिक भुर्दंड पडत आहे. 

ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी येतात. यात मुलींचे प्रमाण मोठे आहे. शासनाच्या अहल्याबाई होळकर योजनेंतर्गत मुलींना मोफत प्रवासाचे पास मिळतात.

लक्कडकोट, देवाडा, भेंडाळा, धानोरा, कविटपेट, नवेगाव, विरुर, कोष्टाळा,  येरगव्हाण, धोंडो, नलङ्कडी, मुर्ती, कोहपरा, चंदनवाई, पाचगाव, आर्वी, मुठरा, सास्ती, खाबांडा आणि देवाडा या गावांतून शेकडो विद्यार्थिनी दररोज शहरात शिक्षणासाठी येतात.

शैक्षणिक सत्राला सुरुवात होऊन जवळपास महिना लोटला. मात्र, परिवहन विभागाने मुलींसाठी पास मिळवण्यासाठी अर्ज उपलब्ध नसल्याचे कारण सांगून बाहेरगावाहून येणा-या मुलींना पास दिले नाहीत. यामुळे मुलींना दररोज पैसे खर्च करून शाळा गाठावी लागते. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी पालकांची धडपडत असते. ग्रामीण भागात अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे त्याचा परिणाम  शिक्षणावर होत आहे. 

त्यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थिनी शिक्षणासाठी शहरात येत आहे. मात्र, मुलींसाठी उपलब्ध असलेल्या अहल्याबाई होळकर योजनेचे पास मिळाले नसल्याने पालकांची चिंता वाढली आहे.काही मुख्याध्यापकांच्या तक्रारीमुळे बाहेरगावावरून राजुरा येथे शिक्षणासाठी येणा-या मुलींना पासेस देणे थांबविले आहे.

"शासनाच्या नियमानुसार ग्रामीण भागात जर शाळा उपलब्ध असेल तर मुलींना बाहेरगावी शिक्षणासाठी मो फत बस प्रवासाची सुविधा अहल्याबाई होळकर योजनेतून देता येत नाही."
- आशीष मेश्राम, आगारप्रमुख राजुरा.

"ग्रामीण भागातील पालकांची परिस्थिती बेताची आहे. त्यातच आता त्यांच्या मुलींना पास देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक भार पडत आहे. राज्य परिवहन मडळाने तातडीने पासेस द्यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल."
- अविनाश जाधव, माजी  जिल्हा परिषद सदस्य.
 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News