विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका लांबल्याने युवकांमध्ये नाराजी...

श्रीकांत जाधव
Thursday, 8 August 2019
  • सरकारने विद्यार्थी निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर फेरविचार करून निवडणुका पूर्ववत करावी अशी मागणी होत आहे. 

२५ वर्षानंतर सुरु करण्यात आलेल्या खुल्या  महाविद्यालयीन निवडणूका सरकाने  पुढे ढकललेल्या आहेत. या निर्णयाबाबत मराठवाडा अससोसिएशन फॉर स्टुडंन्ट स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ विभागीय समितीने जाहीर निषेध व्यक्त केला आहे तसेच विद्यार्थी निवडणुका पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

खुल्या  महाविद्यालयीन निवडणूकामुळे घराणेशाहीला आळा बसून सर्व स्तरांतील नेतृत्व पुढे येईन या साठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर अखेर नवीन विद्यापीठ कायदा २०१६ नुसार महाविद्यालयात खुल्या निवडणूका होणार होत्या पण सरकारने या निवडणूका लांबणीवर टाकून विद्यार्थ्यांची निराशा केली आहे.सरकारने विद्यार्थी निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर फेरविचार करून निवडणुका पूर्ववत करावी अशी मागणी होत आहे. 

यावेळी विद्यार्थी संघटनेचे विभागिय अध्यक्ष श्रीकांत जाधव  निवडणुकीवर बोलताना म्हणाले, '25 वर्षांपासून बंद असलेल्या खुल्या निवडणुकाचालू झाल्या होत्या परंतु आज सरकारने निवडणुका लांबणीवर टाकून युवकांची दिशाभूल केली आहे.सर्वसामान्य घरातील नेतृत्व निर्माण न होऊ देण्याची ही भूमिका या निर्णयातून दिसून येते  तसेच मुख्यमंत्री व उच्च तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा जाहीर निषेध करतो, वेळोवेळी नुसते आश्वासन द्यायचे व वेळप्रसंगी निर्णयामध्ये बदल करायचे यामुळे युवकांच्या मनात नाराजी व्यक्त होत आहे. आम्ही पूर्ण तयारीनिशी या निवडणुकीची तयारी सुरू केली होती परंतु  खुल्या महाविद्यालयीन निवडणुका लांबणीवर टाकून पुन्हा एकदा घराणेशाहीला वाव देण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे.' 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News