बिस्किट खाल्ल्याने संस्थाचालकाने विद्यार्थ्यास केली बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019

भुक लागल्यामुळे सोबतच्या मुलाचे न विचारता दोन बिस्कीट खाल्ल्याची शिक्षा म्हणून संस्थाचालक महाराजाने एका विद्यार्थ्यांस वायरने मारहाण केल्याचा प्रकार

निल्लोड : भुक लागल्यामुळे सोबतच्या मुलाचे न विचारता दोन बिस्कीट खाल्ल्याची शिक्षा म्हणून संस्थाचालक महाराजाने एका विद्यार्थ्यांस वायरने मारहाण केल्याचा प्रकार निल्लोड (ता. सिल्लोड, जि.औरंगाबाद) येथे मंगळवारी (ता.१६) उघडकीस आला असून, विद्यार्थ्याच्या आईने वडोद बाजार पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर संस्थाचालक रामेश्वर पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, निरंजन सतिष जाधव (वय 10, रा. मयुर पार्क, औरंगाबाद) हा विद्यार्थी औरंगाबाद-जळगाव महामार्गालगत निल्लोड फाटा येथील माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होता. भुक लागल्यामुळे सोबतच्या मुलाचे न विचारता दोन बिस्कीट खाल्ल्यामुळे संस्था चालक रामेश्वर पवार महाराज यांनी 11 जुलै रोजी चोरी का केली म्हणून माईकच्या वायरने निरंजन यास बेदम मारहाण केली. मुलाची आई पालक 14 जुलै रोजी निरंजन यास भेटायला गेले असता चेहऱ्यावरील वण  पाहून चौकशी केली असता झालेला प्रकार आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

मारहाण केल्यानंतर या विद्यार्थ्यांवर कोणतेही उपचार केले नसल्याने संतप्त झाल्याने त्याच्या आईने निरंजनला मयुर पार्क, औरंगाबाद येथील घरी घेऊन आल्या. याबाबत विद्यार्थ्याची आई चैत्राली जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक व सुटका                        
निल्लोड (ता. सिल्लोड) येथील निवासी शाळेच्या विद्यार्थ्याला वायरने बेदम मारहाण केल्याच्या गंभीर गुन्ह्यानंतरही याप्रकरणी संस्थाचालक रामेश्वर पवार यांना पोलीसांनी केवळ तालुका दंडाधिकारी (तहसिलदार) यांच्यासमोर हजर केले. याप्रकरणात त्वरीत जामीन मंजुर झाल्याने आश्यर्य व्यक्त होत आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News