एसटीची नव्या युगाची गाथा महाराष्ट्रभर; वारी लालपरीची

शुभम बायस्कार.
Friday, 9 August 2019
  •  ३६ जिल्हे, ५० शहरं व ६ हजार कि.मी.चा प्रवास, मुंबईतून सुरूवात तर गडचिरोलीत समारोप

अकोला: स्वातंत्र्यानंतर १९४८ साली राज्य परिवहन महामंडळाची स्थापना झाली. तेव्हापासून एसटीमध्ये विविध प्रकारचे बदल झाले. या बदलाची सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी राज्य परिवनह महामंडळाद्वारे एसटीची ‘नव्या युगाची गाथा’,‘लालपरीची वारी’ या फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडली जात आहे. 

मुंबईतून सुरू झालेला हा प्रवास ३६ जिल्हे, ५० शहरं व ६ हजार किलोमिटरचा असणार आहे. याचा समारोप गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे होणार आहे. ‘रस्ता तिथे बस’ हे ब्रिद घेऊन एसटी आज सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी झाली आहे. याच जीवन वाहिनीचा काळानूरुप होत असलेला बदल सर्वसामान्य नागरिकांना अनूभवता यावा यासाठी एसटीवर नितांत प्रेम करणाऱ्या तरूणाईच्या 'बस फॉर अस' फाऊंडेशनद्वारे एसटीचा चित्ररथ सध्या महाराष्ट्रभर फिरविण्यात येत आहे. 

१ जून रोजी मुंबई येथून एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण शंकर केवटे (९५) यांच्याहस्ते त्याचे उद्घाटन झाले आहे. त्यानंतर या रथाचे राज्याच्या विविध बसस्थानकांवर प्रदर्शन भरविण्यात येत आहे. ज्या माध्यमातून प्रवाशी, नागरिक लालपरीच्या बदलाची माहिती जाणूण घेत आहे. राज्यभर फिरणारा हा रथ ३६ जिल्हे, ५० शहरांध्ये जाणार आहे. तर ६ हजार किलोमिटरपर्यंत एसटीची गाथा संगण्याचा प्रयत्न करत आहे. ‘एसटीविश्व’ या संकल्पनेतून या चित्ररथाची संकल्पना पुढे आल्याचे बस फॉर अस फाऊंडेशने म्हटले आहे.

 रातराणी ते विठाईपर्यंतचा प्रवास...
 १ जून १९४८ रोजी एसटीची सुरुवात झाली. त्यानंतर तिचा प्रवास कसा होता, लाल डब्यापासून रातराणी, शिवशाही, शिवनेरी, विठाई कशी निर्माण झाली. नव्या बसस्थानकांची निर्मिती, नव्या बस थांब्यांचे नकाशे, सीसीटीव्ही, प्रवाशांसाठी अपघात सहाय्यता निधी व विविध योजना, सवलती, विद्यार्थांच्या सुविधा, रस्ता तिथे एसटी अशा बदलांची माहिती चित्ररथामध्ये चित्रांच्या माध्यमातून अनूभवता येणार आहे.

एसटीच्या स्थापनेपासून तर आतपर्यंत झालेल्या बदलांची माहिती, बसस्थानकांची निर्मिती तसेच भविष्यात होणार बदल नागरिकांना या प्रदर्शनातून पहायला मिळणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून मोफत याचा लाभ घेता येणार आहे.

-रोहित धेंडे, बस फॉर अस फाउंडेशन, मुंबई

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News