मुलींच्या मोफत शिक्षणासाठी छात्रभारतीचा लढा 

अरुण मलानी
Saturday, 26 January 2019

नाशिक : ६ मार्च १९८६ च्या शासन निर्णयानुसार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत मुलींना मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. परंतु काही महाविद्यालयांकडून सर्रासपणे विद्यार्थिनींकडून शुल्क आकारणी होत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर छात्र भारती विद्यार्थी संघटनेने या विरूद्ध लढा उभारला. गेल्या चार वर्षांपासून यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर या प्रकरणी चौकशीसाठी समितीदेखील गठीत केली होती.

चार सदस्यीय समितीत छात्रभारतीचे दोन पदाधिकारी व शासनाचे दोन प्रतिनिधींचा समावेश होता. समितीमार्फत चौकशी केलेले सोळा महाविद्यालय दोषी आढळले होते. या वर्षी देखील यासंदर्भात समितीतर्फे चौकशी करण्यात आली असून, अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. मोफत शिक्षणाशिवाय कॅपिटेशन ऍक्‍टच्या प्रभावी अमलबजावणीसाठी देखील संघटना प्रयत्न करत आहे. याअंतर्गत इमारत निधीसह अन्य विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांकडून जादा शुल्क आकारले जाऊ नये, अशी संघटनेची भुमिका आहे. संघटनेचे नेतृत्व माजी शहराध्यक्ष विशाल रणमाळे, शहराध्यक्ष समाधान बागूल, राकेश पवार, सागर निकम, सचिन भुसारे करत आहेत. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News