संत कबीर संस्काराचे सशक्त वाहक: रजनीश कुमार शुक्ल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019
  • संत कबीर यांना हिंदी साहित्यात विसरता येत नाही. ७०० वर्षा आधी सामाजिक समरसतेच्या दिशेने त्यांनी केलेले कार्य आजही समाजाकरिता प्रेरणादायी आहे.
  • कबीरांनी सहज भाषेचा प्रयोग करत लोकांना संस्कारित करण्याचे काम केले.  
  • कबीरांचा शाश्वत पक्ष जाणून घेण्याकरिता त्यांच्या विचारांवर मंथन करणे क्रम‘प्राप्त आहे

वर्धा: संत कबीर यांना हिंदी साहित्यात विसरता येत नाही. ७०० वर्षाआधी सामाजिक समरसतेच्या दिशेने त्यांनी केलेले कार्य आजही समाजाकरिता प्रेरणादायी आहे. कबीरांनी सहज भाषेचा प्रयोग करत लोकांना संस्कारित करण्याचे काम केले.  कबीरांचा शाश्वत पक्ष जाणून घेण्याकरिता त्यांच्या विचारांवर मंथन करणे क्रमप्राप्त आहे, असे विचार महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू रजनीश कुमार शुक्ल यांनी व्यक्त केले. 

हिदी विश्वविद्यालयात कबीर जयंतीनिमित्त सोमवारी ‘कबीर, कबीर साहित्य आणि आजचा समाज या विषयावर आयोजित चर्चासत्रात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. महादेवी वर्मा  सभाकक्षात झालेल्या कार्यक्रमात कार्यकारी कुलसचिव के.के. सिंह, भाषा विद्यापीठाचे अधिष्ठाता हनुमानप्रसाद शुक्ल, साहित्य विद्यापीठाच्या अधिष्ठाता प्रीती सागर, संस्कृती विद्यापीठाचे अधिष्ठाता नृपेंद्रप्रसाद मोदी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या  प्रारंभी कुलगुरू प्रो.रजनीश कुमार शुक्ल यांनी कबीर हिलवर संत कबीर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी कबीर हिलवरील दादू दयाल, रविदास, गुरुनानक आणि संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून अभिवादन केले. 

चर्चासत्रात विचार मांडतांना हनुमान प्रसाद शुक्ल म्हणाले, संत कबीर सत्याचे  उद्घाटन करणारे कवी होते. अनुभव आधारित सत्याविषयी ते बोलत असत. त्यांचे विचार आधुनिक समाजाकरिताही लागू पडतात. प्रीती सागर यांनी दोह्यांच्या  माध्यमातून सामान्यजनांचे दु:ख मांडणारे कवी म्हणून कबीर यांचा उल्लेख केला. भक्तिकाळात त्यांच्या वाणीने सामाजिक सुधारणेकरिता अस्त्रांचे काम केले. त्यांचे विचार आधुनिक समाजाकरिता अनुसरण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.  के. के.सिंह म्हणाले, सामंतवादी व्ययवस्थेशी संघर्षातून कबीरांचे व्यक्ती‘त्व तयार झाले.

त्यांचे दोहे संवादधर्र्मी असून समाजाच्या  भल्याचा विचार मांडणारे आहेत.  यावेळी डॉ. सुष्मा लोखंडे यांच्या कबीर काळ व कर्तृत्व या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले. डॉ.लोखंडे यांनी संत कबीर आणि संत तुकाराम यांच्या संदर्भात आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी बी.एस. मिरगे यांनी केले. कार्यक्रमाला अध्यापक, अधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News