video: प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचे टॉवरवर चढून आंदोलन

मंगेश शेवाळकर
Tuesday, 6 August 2019
  • विकास कामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.६) सकाळी आठ वाजल्या गावातील बीएसएनएल कंपनीच्या टॉवरवर चढून आंदोलन
  • यापूर्वी तीन वेळा आंदोलन केल्या नंतरही प्रत्येक वेळी प्रशासनाकडून आश्वासने देण्यात आली होती.

हिंगोली: सेनगाव तालुक्यातील केंद्र बुद्रुक येथील विकास कामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.६) सकाळी आठ वाजल्या गावातील बीएसएनएल कंपनीच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे.

सेनगाव तालुक्यातील केंद्र बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सन 2013 ते सन 2019 पर्यंत झालेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, गावातील सांडपाण्याचा प्रश्न सोडवावा, प्रत्येक प्रभागांत विद्युत पोल उभारणी करून पथदिवे बसवावेत, नादुरुस्त विद्युत पोल बदलून द्यावेत, स्वच्छतागृह बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना तातडीने अनुदान द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. 

यापूर्वी तीन वेळा आंदोलन केल्या नंतरही प्रत्येक वेळी प्रशासनाकडून आश्वासने देण्यात आली होती. त्यानंतर आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख अॅड. विजय राऊत, मारुती कोरडे, रवी बांगर, विलास आघाव, भारत कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पदाधिकारी नजीर शहा, मोबीन शहा, अनिल मानेकर, शिवाजी तुरे, किशोर सुलताने, सिताराम सातपुते, अशोक डांगे, साबेर शहा, शबिर शहा, सूनील घनतोडे, यांनी गावातील बीएसएनएलच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. 

जोपर्यंत या मागण्यांबाबत चौकशी केली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. आंदोलन सुरू होऊन दोन तासाचा कालावधी लोटला तरी प्रशासनाचा एकही अधिकारी गावात पोहोचला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News