पनवेल मार्गावर विचित्र अपघात; दिशादर्शक खांबाला डंपर लटकला ,VIDEO पाहाच

सकाळ (यिनबझ)
Saturday, 15 June 2019
  • सायन-पनवेल महामार्गावर डंपरचा विचित्र अपघात 
  • अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही 
  •  अग्नीशमन दलाने केली चालकाची सुटका

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर रात्री उशिराच्या सुमारास डंपरचा विचित्र अपघात झाला. दिशादर्शक खांबाला डंपरची जोरदार धडक बसुन हा अपघात झाला. या जोरदार धडकेने डंपर खांबाला अडकुन बसला. डंपरचे बकेट उघडले गेले आणि वरती दिशादर्शक खांबाला अडकले. त्यामुळे डंपर रस्त्यावर दोन चाकांवर उभा होता. तर दोन चाके हवेत, अशी स्थिती झाली होती. दरम्यान, यात चालक डंपरमध्येच होता. तोही वरती अडकला होता. परंतु  अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

 

घटनास्थळी अग्नीशमन दलाने जाऊन  चालकाची सुटका केली. यामुळे काही काळासाठी येथे वाहतूक कोंडी झाली होती. सध्या डंपर बाजूला काढण्यात आला असून सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. अपघातग्रस्त डंपर भरधाव वेगात असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्यातून हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News