सजीव रक्षणासाठी औद्योगिकरण थांबवा

अॅड. गिरीश राऊत
Monday, 1 April 2019

झाडे लावापेक्षा, 'औद्योगिकरण व शहरीकरण थांबवा' अशी मोहीम हवी. स्वयंचलित यंत्र येईपर्यंत कोट्यावधी वर्षे पृथ्वीवर जंगलाचे आवरण होते. यंत्र- औद्योगिकरण - शहरीकरण- अर्थ व्यवस्था, यामुळे ते जाऊ लागले. झाडे- जंगल आपण लावले नव्हते. कोट्यावधी वर्षे त्यांच्यामधे व त्यांच्यामुळे आपण होतो. औद्योगिक उत्पादनांच्या आकर्षणामुळे आपण त्यांच्याशी वैर केले. 

स्वयंचलित यंत्राला ऊर्जा पुरवण्यासाठी प्रथम जंगले तोडली गेली. नंतर  पृथ्वीच्या पोटातील कोळसा तेल व वायू बाहेर काढून जाळला जाऊ लागला. वातावरणात,  'कार्बन डाय ऑक्साईड' व उष्णता शोषणारी इतर द्रव्ये - वायू वाढल्याने  व त्याचवेळी हरितद्रव्याचा नाश होत गेल्याने तापमान वाढत गेले.

 याला स्वयंचलित यंत्र आल्यानंतरच्या काळातील माणसाची जीवनशैली कारण आहे. ती तशीच चालू ठेवून झाडे लावण्याने काही साध्य होणार नाही. याचा अर्थ झाडे लावू नये असा नाही. मी स्वतः व्यक्तीश: व  साथीदारांसह हजारो झाडे लावली, वाढवली. पण जीवनशैलीसाठी व विकासाच्या नावाने दरवर्षी हजारो चौरस किलोमीटर जंगल तोडले जात असताना, त्यातील जैविक विविधता कायमची नष्ट होत असताना आपल्या झाडे लावण्याला अर्थ उरत नाही.

शिवाय जमिनीचा एखादा तुकडादेखील मोकळा सोडला तर त्यावर वनस्पती वाढतातच. आपण झाडे लावतो असे म्हणण्यात सुप्त अहंकार असतो. बर्‍याचदा पृथ्वीच्या पध्दतीबद्दल तुच्छता व अज्ञान असते.

म्हणून, ज्यामुळे गेल्या २५० वर्षांत झाडे नष्ट झाली ती प्रक्रिया आता तात्काळ थांबवली पाहिजे. झाडे वाचवण्याच्या संदेशात मानवजात व जीवसृष्टी नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे याची स्पष्ट जाणीव हवी. 

जीवनाच्या रक्षणासाठी औद्योगिकरण व शहरीकरण बंद करून सर्वांनी पुन्हा कृषियुगात जाणे आवश्यक आहे.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News