अजूनही टीम इंडिया नव्या कोचच्या प्रतिक्षेत? कोच निवडण्याची जबाबदारी आता 'या' तिघांकडे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019

भारतीय क्रिकेट संघाचा पुढील कोच कोण असणार आहे आणि त्याची निवड कोण करणार आहे, याची उत्सुकता सगळ्या क्रिकेट प्रेमींना आहे. परंतु आता त्यांची ही उत्सुकता लवकरच पूर्ण होणार आहे. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट समिती टीम इंडियाचा पुढील कोच निवडणार आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने क्रिकेट टीमच्या कोच पदासाठी अर्ज मागवले आहेत. 

दरम्यान भारतीय क्रिकेट टीमचा कोच निवडण्याच्या प्रक्रियेसाठी एक सीइओंची बैठक झाली. या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. सीइओचे प्रमुख विनोद राय यांनी दिलेल्या माहितीनुसार कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी या तीन दिग्गजांनकडे कोच निवडण्याची जबाबदारी सोपवली आहे, मात्र आधी मिळालेल्या माहिती नुसार संघाचा कोच निवडण्याची जबाबादीर सीएसीने याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या तीन दिग्गजांनकडे सोपवली होती; मात्र बीसीसीआयच्या संविधानानुसार सीएसी अथवा वेगळे पॅनेल केवळ हेड कोचची नियुक्ती करू शकतात. त्यामुळे नविन निवडलेल्या क्रिकेट कोच निवडीच्या व्वस्थापनानुसार लवकरच भारतीय संघाचा नवा कोच कोण, याचे उत्तर मिळणार आहे आणि सगळ्या क्रिकेट प्रेमींची प्रतीक्षा संपणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News