अजूनही वाटतं...

साक्षी रामदास साळुंखे, सातारा
Saturday, 8 June 2019

अजूनही वाटतं..
कधी कधी खूप हसावं, खूप रडावं,,
आणि सोबत झेललेल्या सुख-दु:खांच्या 
त्या सरींना; अलगद मिठीत घेऊन रहावं..!

अजूनही वाटतं..
ओंजळीत तुझ्या, कुसुमांचा वर्षाव 
होऊन पडावं,, आणि आयुष्यात
आपल्या प्रेमाला; कधीही अंकुश मात्र नसावं..!

अजूनही वाटतं..
कधी कधी खूप हसावं, खूप रडावं,,
आणि सोबत झेललेल्या सुख-दु:खांच्या 
त्या सरींना; अलगद मिठीत घेऊन रहावं..!

अजूनही वाटतं..
साथीने तुझ्या कधी कधी खूप 
खेळकर व्हावं, अन् सर्वकाही शिकत जावं,,
आणि असंच जगता जगता
तुझ्या साथीनेचं म्हातारं व्हावं..!

अजूनही वाटतं..
मी तुझी अन् तु फक्त 
माझा असंच जगावं,,
नि नात्यात आपल्या 
कधीही कुठलचं अंतर मात्र नसावं..!

अजूनही वाटतं..
चांदण्या रात्री सोबत तुझ्या
हितगुज काहीसं करावं,,
अन् बोलता बोलता दोघांनाही 
वेळेचं भानच न उरावं..!

अजूनही वाटतं..
रम्य त्या गुलमोहराप्रमाणं
जीवन आपलं रंगुन जावं,,
अन् रंगलेल्या त्या जीवनाचं 
गुपित मात्र; कुणाला शोधुनही न सापडावं..!

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News