सावत्र आईची  सख्खी माया 

हर्षदा यादव-पाटे
Wednesday, 9 October 2019

नीलिमा आणि राणी ह्या एकमेकींना समजून घेण्यास वेळ होता एकमेकींच्या  मनातले आपापसातील मते जाणून घ्यायाला वेळ होता.. तशी नीलिमा आपल्या बाजूने राणीला समजून घेत होतीच. पण राणीला निलिमाला आई म्हणून आपलेसे करणे तसे कठीणच जात होते..

काल राणी घरी आली होती. थोडी नर्व्हस, थोडी गोंधळलेली होती. मध्येच  चीडचीड चाललेली. काय बोलावे हे तिचे तिला कळत नव्हते. पण बोलायचे मात्र होते. मी थोडा वेळ जाऊ दिला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग तिच्या आवडीची भजी तिच्या पुढे करत मी तिला विचारले राणी काय झालं? काही बोलायच आहे का? तर आधी नाही म्हणाली. पण जशी भजी पोटात जायला लागली तशी शांत राहिलेल्या राणीने बडबड करायला सुरू केली. 

वयाच्या १० व्या वर्षी तिची आई आजाराने गेली. त्यांनतर  तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. हेतू एकच होता कामामुळे  मुलीकडे दुर्लक्ष होऊ नये. राणीला आईची माया मिळावी. चांगले संस्कार व्हावेत आणि तीच भावी आयुष्य हे चांगल्या रीतीने व्हावे. राणीची आई नीलिमा ही शिकलेली एक गृहिणी म्हणून ती सगळ्यात पारंगत होती. स्वभावाने चांगली व्यवहार ज्ञान असलेली नीलिमा राणीसाठी एक आई म्हणून अगदी योग्य होती. नीलिमाच्या आयुष्यात मात्र एक कटू सत्य होत ती कधीच स्वतः आई होणार नव्हती. तिच्या शरीरात बाळाला पेलण्याची ताकद नसल्याने ती कधीच आई होऊ शकत न्हवती. असे असताना स्वतःचे दुःख बाजूला ठेवून नीलिमाने राणीला आपली मुलगी मानले होते. 

नीलिमा आणि राणीच्या बाबांचे लग्न झाले तेव्हा राणी अवधी ११ वर्षांची होती, म्हणजे तशी लहान होती. त्यामुळे नीलिमा आणि राणी या एकमेकींना समजून घेण्यास, एकमेकींच्या  मनातले आपापसातील मते जाणून घ्यायाला वेळ होता. तशी नीलिमा आपल्या बाजूने राणीला समजून घेत होतीच. पण राणीला निलिमाला आई म्हणून आपलेसे करणे तसे कठीणच जात होते. कारण दोघी मधले समज गैरसमज बोलण्यातला अबोला हे त्यांच्या नात्याला दुरावा आणत होते. पण त्यांच्यातला दुरावा, हा अबोला त्या दोघींशिवाय मिटणार नव्हता. 

ह्या सगळ्याच एकच कारण म्हणजे राणी तिची सख्खी आई नव्हती. असे ज्या ठिकाणी वातावरण असते तिथे गैरसमज हे जास्त करून होतात. शेजारधर्म हा आपला धर्म निभावण्यासाठी उत्सुक असतो. कारण तुलना करून मुलांना भडकवणे हे काही आताच्या जगात घडत नाही. त्यामुळे राणीला तिच्या आईला समजून घेता आले नव्हते आणि त्यातच नीलिमा ही जास्त काळजीत असायची.

राणी आता मोठी आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागली. पण दोघीं मधला दुरावा आहे तसाच राहिला.  नीलिमा मात्र हताश झाली कारण मूल नसल्याचे दुःख हे तितके बाकी कोणालाच कळणारे नव्हते. राणीलाच आपला पोटचा गोळा समजून ती वाढत होती. लाड करायची राणीला काय हवे नको ह्याची काळजी ती  घ्यायची. कधी ओरडायची पण आजतगायत राणीवर कधीच हात उचलला नव्हता. कारण ओरडल्याने राणीची तिचा बाबतची वागणूक ही बदलायची. राणी आपल्या पासून लांब जाऊ नये म्हणून नीलिमा कधी कधी आई म्हणून पटत नसतानाही राणीला तिच्या मनाप्रमाणे वागायला द्यायची. हे सगळे राणीच्या बाबानी बघितले होते. ते नीलिमाला नेहमी समजवायचे. समजून घ्यायचे. राणी मात्र दुसऱ्यांचे ऐकून ही आई आपली सावत्र आहे ही कधी आपले भलं बघणार नाही अशा विचारांनी राग राग करायची आणि सगळ्या पाहुण्यांमध्ये आईची ओळख ही सावत्र आई आहे अशी करून द्यायची. निलीमाला ह्या सगळ्याच खूप त्रास व्हायचा. खरा पण राणी कडे कधीच तिने तक्रार नाही केली.

एक दिवस मात्र राणी जरा जास्तच चुकीचे वागली. कारण थोडं गंभीर होत. ज्यात राणीच्या आयुष्याचा प्रश्न होता. आई म्हंटले तर मुलगी कितीही मोठी झाली लग्न झाले तरी, मुलीला आपल्या पंखातून वेगळे करायला थोडे जड जातेचं. कारण आयुष्याचा मोठा निर्णय घेणं सोपे नाही. राणीला मधल्या ग्रुप मधील एक मुलगा आवडायचा. दोघे पण एकमेकांना पसंत करत होते पण, लग्न करायचे ठरवले असले तरी लग्न हे काही दोघांचे नसून, त्यात दोन घरे त्यातील माणसे आणि त्यांचे वेगवेगळे स्वभाव, विचारांची सांगड जमणेही तितकेच महत्वाचे असते. 

सौरभ हा राणीचा नवरा. तोही राणी इतकाच शिकलेला. मात्र  राणीचा स्वभाव हा सौरभच्या घरच्यांना पटेलच असे नाही. राणी थोडी हट्टी होती. मनासारखे झाले नाही तर राणी घर डोक्यावर घेणारी होती. अशा स्वभावाला दुसऱ्या घरात सामावून घेणं तस कठीणच असते. कारण हाताची बोटे ही सारखी नसतात. सौरभच्या घरचे वातावरण हे राणीच्या घरच्या वातावरणापेक्षा थोडे वेगळे आहे. त्यांच्या घरच्या रीती भाती  ह्या वेगळ्या आहेत. त्यामुळे राणी ह्या सगळ्यात बसणार नाही आणि तिला पुढे ह्या सगळ्याचा त्रास होऊ शकतो म्हणून नीलिमाने त्यांच्या नात्याला विरोध केला. मात्र नेहमी प्रमाणे राणीने चुकीचे समज करून घेऊन निलीमाला ती सावत्र आई आहे असे भासवून दिले. नीलिमाने आणि घरातल्या सगळ्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही मी करीन तर त्याच्याशीच अश्या मतावर राणी ठाम राहिली. 

अखेर नीलिमाने सगळ्यांची समजूत काढून हे लग्न लावून दिले. आज राणी सुखात आहे पण आज ज्या घरात ती राहते, तिथे वेळोवेळी करावी लागणारी मनाविरुद्धची adjustment ही तिला तिच्या आईचे प्रत्येक बोल आठवून देतात. आणि ते आठवून आजही राणीच्या डोळ्यात त्याच सावत्र आईसाठी पाणी येत आहे. राणीला त्रास नाही पण दरवेळी मनाला घालावी लागणारी  मुरड, कधीही आईचे न ऐकल्याने  होणारी तारांबळ यातून होणारी घुसमट ही राणीला आपल्या आईची आठवण करून देते. खरंच राणीला जीव लावणारी आई ही सावत्र होती? की तिची माया सख्याआईसारखी  होती  हे राणीला आता समजले होते. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News