क्रांतीदिनी होणारे आंदोलन थांबवत मराठा क्रांती मोर्चाने उचलले "हे पाऊल"

राजेभाऊ मोगल, औरंगाबाद
Friday, 9 August 2019

औरंगाबाद - सांगली, कोल्हापुर परिसरात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमुळे हाहाकार माजला आहे. त्यांच्या प्रती असलेल्या संवेदना व्यक्‍त करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (ता. 9) नियोजित आंदोलन स्थगीत केले आहे. शिवाय, तेथे जाऊन मदत करणार असल्याचा निर्धारही समन्वयकांनी व्यक्‍त केला. 

औरंगाबाद - सांगली, कोल्हापुर परिसरात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमुळे हाहाकार माजला आहे. त्यांच्या प्रती असलेल्या संवेदना व्यक्‍त करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (ता. 9) नियोजित आंदोलन स्थगीत केले आहे. शिवाय, तेथे जाऊन मदत करणार असल्याचा निर्धारही समन्वयकांनी व्यक्‍त केला. 

सध्या राज्याच्या विविध भागात पावसाने जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. विशेषत: सांगली आणि कोल्हापुर परिसरातील हजारो एकरावरील केवळ पिकेच पाण्याखाली गेली, असे नव्हे तर शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत. यात आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांसह इतर सर्वांचेच करोडो रुपयांचे नुकसान झाले. त्यांच्या जगण्याचा प्रश्‍न निर्माण झालेला असताना आपण आंदोलने करणे, हे संवेदना बोथट असल्याचे लक्षण होईल, असे म्हणत क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी क्रांतीदिनी येथील क्रांती चौकात होणारे आंदोलन स्थगीत केले आहे. 

गेल्या तीन वर्षापासून सरकार मराठा समाजाच्या मागण्याकडे दूर्लक्ष आहे. प्रलंबीत मागण्यांवर बोलत नाही. आरक्षणाच्या लढ्यात बलीदान दिलेल्या बांधवांना अद्यापही मदत दिलेली नाही. त्यांच्या घरातील एका व्यक्‍तीस नोकरीही दिलेली नाही. यासाठी क्रांतीदिनी आंदोलनाचा निर्धार केला होता. मात्र, पुरपरिस्थितीमुळे हाहाकार उडालेला असताना आंदोलन करणे, हे आपले संस्कार नाहीत, असेही समन्वयकांनी बोलून दाखवले. 

पुरग्रस्त भागात आवश्‍यक त्या मदतीसाठी आम्ही तेथे जाणार आहोत, असे क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी जाहीर केले. यावेळी रविंद्र काळे, सुनील कोटकर, किशोर चव्हाण, निलेश ढवळे, संतोष काळे, किशोर शिरवत, संजय सावंत, अशोक मोरे, सचिन मिसाळ, विशाल सुर्यवंशी, ज्ञानेश्वर गायकवाड, गजानन पाटील, दिलीप झगरे, अतुल औताडे, विशाल पवार, किरण काळे, दत्ता भोकरे, राहुल पाटील, श्रीकांत माने यांच्यासह समन्वयक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News