आयुब कलाम शेख यांना राज्यस्तरीय इनोव्हेशन अवार्ड जाहिर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 July 2019

मुंबई : पुणे-स्टेट इनोव्हेशन अॅन्ड रिसर्च फाउंडेशन (सर फाऊंडेशन) यांच्या वतीने देण्यात येणारा "राज्यस्तरीय टिचर इनोव्हेशन अवार्ड २०१९" राज्यातील ८७ शिक्षकांना जाहीर झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका शाळा क्र.१७४ बी,कोंढवा बुद्रुक शाळेतील उपक्रमशील शिक्षक आयुब कलाम शेख यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने भव्य अशा समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांनी राबविलेल्या "शनिवार माझा कलाकुसरीचा" या नाविन्यपूर्ण उपक्रमाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय स्तरावरील "इनोव्हेशन प्रॅक्टिसेस इन स्कूल एज्युकेशन काॅन्फरन्से मध्ये होणार आहे. व्याख्याने, परिसंवाद,चर्चा, नवीन शैक्षणिक प्रयोगाचे सादरीकरण, पुरस्कार वितरण,अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी यावेळी सहभागी शिक्षकांना मिळणार आहे. सर फाऊंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ,हेमा शिंदे यांनी ही माहिती दिली. आयुब कलाम शेख यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News