राज्यस्तरीय बॉक्सींग स्पर्धा सुरु

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019

वसंत देसाई क्रीडांगणावर २१ ते २३ जून दरम्यान सहावी सब ज्युनिअर बॉक्सींग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

अकोला - येथील वसंत देसाई क्रीडांगणावर २१ ते २३ जून दरम्यान सहावी सब ज्युनिअर बॉक्सींग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
 
या स्पर्धेचे आयोजन बॉक्सींग फेडरेशनचे सचिव मिलिंद वैद्य, एकनाथ चव्हाण, राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. या स्पर्धेला २१ जून रोजी रिपोर्टींग तर २२ आणि २३ जून रोजी ही बॉक्सींग स्पर्धा रंगणार आहे.

या स्पर्धेत पुणे, मुंबा, मुंबई, अहमदनगर, वर्धा, अकोला, सातारा यांच्यासह राज्यातील असंख्य जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे.    
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News