औरंगाबादेत काँग्रेसची अवस्था दयनीय : इच्छुकांना आवाहन करण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019

औरंगाबाद : देशावर ७० वर्षे सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसची अवस्था एवढी दयनीय झाली आहे, की इच्छुकांना आवाहन करण्याची वेळ आली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना-भाजप आणि वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारीसाठी रांगा लागल्या असताना काँग्रेसने मात्र उमेदवारांना निवडणूक लढण्याची इच्छा असेल, तर या अन्‌ अर्ज घेऊन जा, असे आवाहन केले आहे.  औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांच्यावर डिपॉझिट गमाविण्याची नामुष्की ओढवली.

काँग्रेस उमेदवाराची अशी अवस्था जिल्ह्यात पहिल्यांदाच झाली. त्याचा परिणाम आता विधानसभा निवडणुकीवर दिसत असल्याने नेत्यांची घालमेल वाढली आहे.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News