परीक्षा केंद्रावर गर्दी, बारावीच्या पुरवणी परीक्षेला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ११ व चिक्‍कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील ११ केंद्रांवर पुरवणी परीक्षा सुरु आहे.

बेळगाव - बारावीच्या पुरवणी परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी समाजशास्त्र, अकौंटन्सी, गणित या विषयांचे पेपर सकाळच्या सत्रात, तर दुपारी गृहविज्ञान विषयाचा पेपर झाला. पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थी संख्या अधिक असल्यामुळे सर्रास परीक्षा केंद्रावर गर्दी पहावयास मिळाली.
मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी पुरवणी परीक्षा घेण्यात येते. त्यानुसार मंगळवारी पुरवणी परीक्षेला सुरुवात झाली.

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ११ व चिक्‍कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील ११ केंद्रांवर पुरवणी परीक्षा सुरु आहे. बारावीच्या वार्षिक परीक्षेप्रमाणेच शिक्षण खात्याने पुरवणी परीक्षेसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. पहिल्या सत्रातील समाजशास्त्र, अकौंटन्सी व गणित विषयांच्या पेपरला १०.१५ मिनिटांनी सुरुवात झाली. तर दुसऱ्या सत्रात २ वाजता गृहविज्ञान विषयाचा पेपर झाला. सकाळच्या सत्रात पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. परीक्षा काळात कोणत्याही प्रकारे कॉपी करता येऊ नये, यासाठी भरारी पथके लक्ष ठेवून होती. 

शहरातील ज्योती महाविद्यालय, जीएसएस महाविद्यालय, लिंगराज महाविद्यालय, आरएलएस महाविद्यालय, सरदार्स महाविद्यालय, चिंतामनराव महाविद्यालय या सहा परीक्षा केंद्रावर तसेच बैलहोंगल येथील २ तर खानापूर, रामदुर्ग व सौंदत्ती येथील एका परीक्षा केंद्रावर परीक्षा झाली. बुधवारी (ता. १२) इंग्रजी विषयाचा पेपर होणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News