आता विद्यार्थ्यांची धावपळ सुरू... महाविद्यालयीन प्रवेशाला सुरुवात 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची झुंबड; पहिली यादी १४ जूनला 

अलिबाग - बारावीच्या निकालानंतर प्रथम वर्ष बी.ए., बी. कॉम, बीएसस्सी, बीएमएस, आयटी, कॉम्प्युटर सायन्स या शाखेच्या प्रवेशासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असल्याने सायबर कॅफेमध्येही प्रवेशाचे अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांसह पालकांची झुंबड होऊ लागली आहे. 

प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असल्‍याने mum.digitaluniversity.ac  संकेतस्थळावर अर्ज स्वीकारला जाणार आहे. १३ जूनपर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत आहे. अलिबागमधील जेएसएम महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया जोरात सुरू असून कार्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. प्रथम वर्ष बी.ए., बीएसीस्सीच्या प्रत्येकी दोन तुकड्या असून प्रत्येक तुकडीमध्ये १२० प्रमाणे २४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

 प्रथम वर्ष बी. कॉमच्या चार तुकड्या आहेत. त्यातील तीन तुकड्या अनुदानित असून त्यात ३६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. तसेच विनाअनुदानित एक तुकडी असून १२० विद्यार्थ्यांना प्रवेश असणार आहे. बीएमएसमध्ये ६०, आयटीमध्ये ६० आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये ४८ विद्यार्थ्यांना प्रवेश असणार आहे. 

प्रवेश अर्जाच्या छाननीनंतर पहिली गुणवत्ता यादी १४ जून, दुसरी गुणवत्ता यादी १७ जून, तृतीय अंतिम गुणवत्ता यादी २० जूनला जाहीर केली जाणार असल्‍याची माहिती देण्‍यात आली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News