रेट्रो लूकमध्ये झळकली ‘सेक्रेड गेम्स २’ ची स्टार कास्ट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 July 2019

लवकरच ‘सेक्रेड गेम्स २’ वेबसीरिजचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. नुकतेच या वेबसीरिजच्या स्टारकास्टने एक फोटोशूट केले आहे आणि नेटफ्लिक्‍सने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मुंबई :  नेटफ्लिक्‍सवरील ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजचा पहिल्या सीजनने डिजिटल दुनियेत आणि चाहत्यांमध्ये धुमाकूळ घातला होता. आता लवकरच या वेबसीरिजचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. नुकतेच या वेबसीरिजच्या स्टारकास्टने एक फोटोशूट केले आहे आणि नेटफ्लिक्‍सने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

त्यात अभिनेता सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी, रणवीर शोरे, अभिनेत्री कल्की कोचलिन, सुरविन चावला हे कलाकार वेगळ्या अंदाजात दिसून येत आहेत. त्यांचा हा ग्लॅमरस आणि स्टाईलिश लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘सेक्रेड गेम्स२’ येत्या १५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News