सेंट जॉर्ज महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केले समाजाला जागरूक! 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 7 August 2019

धावते युग, धावत्या जगातील व्यस्त आई किंवा चुलं आणि मुलं करणारी आई, आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आली आहे. ही बाब जरी कौतुकास्पद असली तरी कळत-नकळतपणे का होईना तिच्याकडून काही गोष्टींची पूर्तता कालांतराने होत नाही. त्यात उदाहरण द्यायचे तर स्तनपान. 

बाळाचा जन्म झालाकी पहिले सहा महिने आईचे दूध पाजणे हे अत्यंत गरजेचे असते, पण आजच्या टेक्नो महिला कामाच्या बिझी शेड्युलमुळे त्या बाळाला दूध पाजण्यासाठी दुधाच्या बाटलीचा किंवा पाळणाघराची मदत घेतात, पण याचं गोष्टी किती धोकादायक आहेत याबद्दल मुंबईतील फोर्ट येथील सेंट जॉर्ज परिचारिका महाविद्यालयातील नर्सिंग शिकणाऱ्या विद्यार्थिनीने 'जागतिक स्तनपान आठवडा' नीमित्त (०१ ऑगस्ट ते ०७ ऑगस्ट) जनजागृतीपर पथनाट्य सादर केले.

तसेच भित्तीपत्रकेसुद्धा बनवून जेवढी समाजात जागृती निर्माण करता येईल, तेवढी करण्याचा प्रयत्न केला. या जनजागृतीपर कार्यासाठी अधिक्षक मधुकर गायकवाड, युनिट हेड डॉ. श्रुती डहाळे व डॉ. संदीप पोफळे, सहाय्यक अधिसेविका, पाठयनिर्देशिका तसेच ओ. पी. डीच्या डॉक्टरांनी उपस्थिती दर्शवली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News