दहावीच्या निकालात २० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण; यात लातूरमध्ये सर्वाधिक १६ विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा निकाल ७७.१० टक्के लागला असून निकालात तब्बल १२.३१ टक्क्यांनी घट झाली आहे. दरम्यान यंदाच्या निकालात तब्बल २० विद्यार्थ्यांनी १००  टक्के गुण मिळवले आहेत. 

राज्यात १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी जवळपास १२ लाख विद्यार्थी पास झाले. यातील तब्बल २० विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. यात लातूरमध्ये सर्वाधिक १६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर त्यापाठोपाठ औरंगाबादमध्ये ३ विद्यार्थी आणि अमरावतीमधील एका विदयार्थ्याचा समावेश आहे. दरम्यान यात मुंबई आणि पुण्याचा एकही विद्यार्थी नसल्याचंही बोर्डाने स्पष्ट केलं आहे.

दहावीचा विभागवार निकाल

पुणे – 82.47 टक्के
नागपूर – 67.27 टक्के
औरंगाबाद – 75.20 टक्के
मुंबई – 77.04 टक्के
कोल्हापूर – 86.57 टक्के
अमरावती – 71.97 टक्के
नाशिक – 77.57 टक्के
लातूर 72.87 टक्के
कोकण 88.38 टक्के

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News