खारफुटी स्वच्छता अभियानाला तरुणाईचा उस्फूर्त प्रतिसाद - व्हिडिओ पाहा

अच्युत पाटील
Wednesday, 5 June 2019
  • प्लास्टिक पिशव्या व अन्य वस्तू मुळे खारफुटी नष्ट होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची भीती लक्षात घेऊन सूर्यास चौधरी यांनी मोहीम सुरू
  • पंचाहत्तर वर्षाच्या  प्रफुल्लता मड्यारकर यांचा सहभाग
  • राष्ट्रीय सेवा योजन मोहिम अंतर्गत विद्यार्थ्यांना सहभागी होणार

 

बोर्डी: समुद्र किनार्‍यावर राबविण्यात आलेल्या खारफुटी स्वच्छता अभियान मोहिमेला युवक युवतींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. उल्लेखनीय म्हणजे पंचाहत्तर वर्षाच्या  प्रफुल्लता मड्यारकर यांच्या सह सरपंच प्रेरणा राठोड, सदस्य सामील राऊत, औरंगाबाद येथून  जंगल कॅम्प साठी आलेल्या साक्षी सावे,  सदस्या रुपाली सावे यांनी सहभागी होवून तरुणांचा उत्साह वाढवला. 
  
निसर्ग प्रेमी सूर्यास चौधरी यांनी वन्यजीव संरक्षण समिती आणि ग्राम वनसंरक्षण समितीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खारफुटी स्वच्छता अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. बोर्डी-घोलवड गावाच्या मध्यभागी असलेल्या खुटखाडी परिसरात खारफुटी वन, नैसर्गिक रित्या वाढले आहे. मात्र प्लास्टिक पिशव्या व अन्य वस्तू मुळे खारफुटी नष्ट होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची भीती लक्षात घेऊन सूर्यास चौधरी यांनी मोहीम सुरू केली.

पुढील महिन्यात राष्ट्रीय सेवा योजन मोहिम अंतर्गत विद्यार्थ्यांना सहभागी करून स्वच्छता अभियान सुरू ठेवण्याचा संकल्प केला आहे.  त्याच प्रमाणे बोर्डीगावाच्या पूर्वेला असलेल्या पर्वत रांगेतील बालकाच्या डोंगरावर सुमारे दहा हजार बीया पेरण्याचा संकल्प केला आहे.  या मोहिमेत मृणाल ठाकुर, लक्षण पालवा, गोविंद गवळी, शैलेश पालवा, यश टेलर, निवृत्त शिक्षक रमेश राऊत, प्राध्यापक संदिप ठाकुर, निलेश राठोड, भावीन नहार, तुषार आरेकर, आदी पर्यावरण प्रेमी सहभागी झाले होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News