"यशाची गुरुकिल्ली" मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवचरण वावळे
Monday, 10 June 2019

बारावीच्या विद्यार्थ्यांनी केवळ वैद्यकीय प्रवेशाइतके एकच ध्येय न ठेवता प्रत्येक विद्यार्थ्यांकडे ‘बी’ प्लॅन सुद्धा ठरलेला असावा. ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अनेकांना वैद्यकीय शाखा इतकीच माहिती असते. परंतु त्यापुढे सुद्धा अनेक चांगल्या शाखा आहेत.

नांदेडः बारावीच्या विद्यार्थ्यांनी केवळ वैद्यकीय प्रवेशाइतके एकच ध्येय न ठेवता प्रत्येक विद्यार्थ्यांकडे ‘बी’ प्लॅन सुद्धा ठरलेला असावा. ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अनेकांना वैद्यकीय शाखा इतकीच माहिती असते. परंतु त्यापुढे सुद्धा अनेक चांगल्या शाखा आहेत. ज्यात उत्तम करीअरची संधी खुणावत आहे. ती आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव तयार असावे, असा यशाचा कानमंत्र प्रा. डॉ. ए. डी. काटदरे यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

‘सकाळ’ माध्यम समुहातर्फे आयोजित व संजय घोडावत विद्यापीठ (कोल्हापूर) यांच्या वतीने रविवारी (ता. नऊ) भाग्यनगर येथील ‘विद्याश्रम’, आयडियल इन्स्टिट्युट आॅफ बायोलॉजी येथे उच्च शिक्षणातील संधी, आव्हाने, महत्व या विषयावर मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी नुकतेच बारावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण व नीट परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन शिबिरास मोठी गर्दी केली होती.
 
या प्रसंगी प्रा. डॉ. ए. डी. काटदरे, प्रा. अर्जुन पाटील व श्रीशैल सलगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बारावी नंतरच्या करिअर मधील विविध संधी, शिक्षण क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवरील करीअरचे विस्तारत असलेली नवनवीन क्षितिजे तसेच विद्यार्थ्यांच्या अंगभुत असलेले गुण कौशल्य व कल अशा सर्व गोष्टींचा विचार करुन करिअरची निवड कशी करावी, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी केवळ एमबीबीएस हे एकच क्षेत्र डोक्यात न ठेवता फार्मसी सारख्या क्षेत्राचा देखील करिअर म्हणून विचार करावा. कारण कुठलाही डॉक्टर मेडिसीन तयार करत नाही.

मेडिसीन हा फार्मसिस्ट तयार करतो आणि त्याची माहिती डॉक्टरांना देतो. तेव्हा फार्मसी या क्षेत्रात देखील मोठमोठ्या कंपनीमध्ये मोठ्या संधी असून, ‘बी’ प्लॉन म्हणून विद्यार्थ्यांनी त्याकडे बघावे, असे आवाहन त्यांनी या वेळी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना केले. या वेळी विद्यार्थ्यांना संजय घोडावत विद्यापीठाच्या वतीने सुरु असलेल्या विविध कोर्सेस व विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा या विषयी पावर पॉईंट प्रझेंटेशनच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News