अध्यात्मिक इगतपुरी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 July 2019

प्राचीन काळापासूनच नाशिक जिल्ह्याला धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभलंय. याच जिल्ह्याच्या दक्षिणेस आहे इगतपुरी नावाचं निसर्गरम्य ठिकाण. इगतपुरी आणि पुणे जिल्ह्यातील खंडाळा ही दोन्ही थंड हवेची ठिकाणं म्हणून ओळखली जातात. या दोहोंची उंचीही सारखीच, म्हणजे समुद्रसपाटीपासून सुमारे १९०० फूट. या परिसरातील अनेक धबधबे पावसाळ्यात इथं पर्यटकांची झुंबड उडवतात. या शहराजवळच असलेला धनुष्यतीर्थ धबधबा हा पर्यटकांचं विशेष आकर्षण आहे. त्याशिवाय इथल्या विपश्‍यना केंद्रातही देश-विदेशातून भाविक येत असतात. इगतपुरी शहराच्या सीमेवरच हे बौद्ध धर्माचं धम्मगिरी हे विपश्‍यना केंद्र आहे.

प्राचीन काळापासूनच नाशिक जिल्ह्याला धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभलंय. याच जिल्ह्याच्या दक्षिणेस आहे इगतपुरी नावाचं निसर्गरम्य ठिकाण. इगतपुरी आणि पुणे जिल्ह्यातील खंडाळा ही दोन्ही थंड हवेची ठिकाणं म्हणून ओळखली जातात. या दोहोंची उंचीही सारखीच, म्हणजे समुद्रसपाटीपासून सुमारे १९०० फूट. या परिसरातील अनेक धबधबे पावसाळ्यात इथं पर्यटकांची झुंबड उडवतात. या शहराजवळच असलेला धनुष्यतीर्थ धबधबा हा पर्यटकांचं विशेष आकर्षण आहे. त्याशिवाय इथल्या विपश्‍यना केंद्रातही देश-विदेशातून भाविक येत असतात. इगतपुरी शहराच्या सीमेवरच हे बौद्ध धर्माचं धम्मगिरी हे विपश्‍यना केंद्र आहे. म्यानमारच्या बौद्ध धर्मीयांनी बांधलेलं पारंपरिक बौद्ध शैलीतलं प्रवेशद्वार लक्ष वेधून घेणारं आहे.पावसाळ्याच्या सुरवातीच्या दिवसांत इगतपुरी परिसरात काजव्यांची लुकलुकणारी दुनिया अवतरते. निसर्गाचा महोत्सव अवघे काही दिवस चालतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News