स्पायडर-मॅनने भारतात गाठली नवीन विक्रमांना गवसणी !  

जयेश सावंत (यिनबझ)
Saturday, 13 July 2019
  • स्पायडर-मॅन बनला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 
  • आठवड्याभरातच  कमावले ६० कोटी 

एवेंजर्स एंडगेमच्या तीव्र आणि वेदनादायी प्रवासानंतर, मार्वल हलक्या चित्रपटासह पुन्हा एकदा भारतात परत आला तो स्पायडर-मॅन: फार फ्रॉम होम च्या रूपात. यामध्ये स्पायडर-मॅनच्या प्रमुख भूमिकेत टॉम हॉलंड होता. 

स्पायडर-मॅन: फार फ्रॉम होम एंडहगेमनंतरच्या गोष्टीवर प्रकाश टाकते, जेथे पीटर पार्करने आपल्या सहकारी सुपरहिरोच्या मृत्यूनंतर येणाऱ्या संकटांचा कसा सामना केला हे दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट आधीच जगभरात ७०० दशलक्ष डॉलर्स पार करुन गेला आहे आणि त्याची कमाई धीमी होईल अस लवकर होणार असे वाटत नाही.

मार्वलच्या पूर्वीच्या चित्रपटांप्रमाणेच, हा चित्रपटदेखील भारतात खूप चांगला व्यवसाय करत आहे, आणि या चित्रपटाने ६० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. भारतात कालपर्यंत 61.21 कोटी रु. चा गल्ला जमवून याआधीच्या सर्व स्पायडर-मॅन चित्रपटांच्या कमाईचा टप्पा कधीच पार केला आहे. आणि आता हा चित्रपट भारतातील सर्वात जास्त कामे करणारा चित्रपट बनला आहे. 

स्पाइडरमॅन: फॉर फ्रॉम होमने भारतीय बॉक्स ऑफिसवर सकारात्मक सुरुवात केली होती परंतु आठवड्याच्या अखेरीस थोडीशी कमी कमाई झाली. चित्रपट सोमवारी 4.65 कोटी आणि मंगळवारी 3.15 कोटी बुधवारी (3.40 कोटी रुपये) आणि गुरुवार (3.35 कोटी रुपये) इतकी कमाई केली. 

आम्ही ऋतिक रोशनच्या सुपर 30 च्या रिलीजसह इतर चित्रपटाच्या तुलनेत कशी कामगिरी करतो, हे पहायला आवडेल. तसेच हा चित्रपट कॅप्टन मार्वलच्या (84.20 कोटी) कलेक्शनचा टप्पा पार करू शकेल का ते पाहावे लागेल.  स्पाइडरमॅन: फॉर फ्रॉम होम भारतात 4 जुलै रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत रिलीज झाला. आणि भारतात रिलीजनंतर सर्वात मोठा स्पायडर-मॅन चित्रपट असल्याचे सिद्ध केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News