स्पायडर-मॅनने कमावले तब्बल एक अब्ज कोटी

जयेश सावंत (यिनबझ)
Saturday, 27 July 2019
  • स्पायडर-मॅन : फार फ्रॉम होम आता एक अब्ज डॉलर्सची कमाई करणारा चित्रपट  ठरला आहे
  • भारतात, फॉर फ्रॉम होमने चक्क रु. 100 कोटी (सुमारे 14.4 दशलक्ष डॉलर्स) रुपयांचा टप्पा पार केला आहे​.

स्पायडर-मॅन : फार फ्रॉम होम आता एक अब्ज डॉलर्सची कमाई करणारा चित्रपट बनला आहे, सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यापासून एक महिन्यापेक्षाही कमी वेळात या चित्रपटाने ही किमया साधली आहे आणि असं करणारा प्रथमच स्पायडी चित्रपट बनला आहे.

इतकेच नव्हे तर जगातील सर्वात जास्त कमाई करताना या चित्रपटाने मागील सर्व स्पायडर-मॅन चित्रपटांना मागे टाकून पहिला क्रमांक गाठला आहे.

गुरुवारी, जगभरातील बॉक्स ऑफिसवर नवीन मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सने 1.005 अब्ज डॉलर्स (सुमारे 6, 9 40 कोटी रुपये) कमावले होते, एव्हेंजर्स, आयर्न मॅन 3, अव्हेंजर्स - एज ऑफ अल्टरॉन, कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर, ब्लॅक पॅंथर, एवेंजर्स: इन्फिनिटी वॉर, कॅप्टन मार्वल आणि एवेंजर्स: एंडगेमनंतर हा एमसीयूचा नवा अध्याय बनला. 2012 च्या जेम्स बाँडच्या स्कायफॉल (1.1 बिलियन डॉलर्स) नंतर बॉक्स ऑफिसवर एक अब्जापेक्षा अधिक कमाई करणारा फार फ्रॉम होम त्याच्या सह-निर्माता सोनी पिक्चर्ससाठी फक्त दुसराच चित्रपट ठरला आहे.

आणखी सांगण्यासारखे असे आहे की, स्पायडर-मॅन: फॉर फ्रॉम होम जागतिक बॉक्स ऑफिसमध्ये एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक कमावण्यामध्ये 40 व्या स्थानावरील चित्रपट आहे आणि डिस्ने त्या 40 चित्रपटांपैकी अर्धे चित्रपटांचा भाग आहे. आणि त्यात म्हणजे डिस्नेच्या 20 अब्ज डॉलर्स कमावणाऱ्या कमावत्यांपैकी अर्ध्या चित्रपट एमसीयू किंवा स्टार वॉर्समधून आहेत. यावरूनच हॉलीवुडमध्ये डिस्ने किती शक्तिशाली बनली आहे ते दर्शवते, 

सध्याच्या 1.005 अब्ज डॉलर्सपैकी स्पाइडर-मॅन: फॉर फ्रॉम होमने अमेरिकेत अंदाजे 333 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (2,300 कोटी रुपये) कमावले आहेत तर उर्वरित 672 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 4,640 कोटी रुपये) इतर सर्व देशांतून आले आहेत, त्यापैकी सर्वात मोठी कमाई चीन (20 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स), त्यानंतर दक्षिण कोरिया (56 दशलक्ष डॉलर्स), यूके (36 दशलक्ष डॉलर्स), मेक्सिको (30 दशलक्ष डॉलर), जपान (26 दशलक्ष डॉलर), ब्राझील (25 दशलक्ष डॉलर्स), ऑस्ट्रेलिया (24 दशलक्ष डॉलर्स), रशिया (20 दशलक्ष डॉलर्स), आणि फ्रान्स ($ 20 दशलक्ष). तर भारतात, फॉर फ्रॉम होमने चक्क रु. 100 कोटी (सुमारे 14.4 दशलक्ष डॉलर्स) रुपयांचा टप्पा पार केला आहे, जो हिंदी चित्रपटातील वितरकांसाठी स्वप्नवत आकडा आहे,

स्पायडर-मॅन : फार फ्रॉम होम एमसीयूच्या फेज 3 मधील अंतिम चित्रपट होता. मागील आठवड्याच्या अखेरीस मार्वलने सॅन दिएगो कॉमिकॉनमध्ये फेज 4 घोषित केले होते,ज्यामध्ये ब्लॅक विडो, द इटरनल, शांग-ची आणि द लीजेंड ऑफ द टेन रिंग्ज, डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टिव्हस ऑफ मॅडनेस, आणि थोर: लव अँड थंडर; तसेच डिस्ने + सीरीज़ द फाल्कन अँड द विंटर सोलिडर, वांडा-विझन, लोकी, व्हॉट इफ..., आणि ब्लेड यां चित्रपटांची घोषणा केली.

फॉर फ्रॉम होमचा पुढील भागाची सुद्धा उत्सुकता लागून राहिली आहे, परंतु अद्याप याबाबत कोणतीही घोषणा केली गेली नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News