रात्र घालवली तिच्या सोबत

प्रतिक कांबळे
Saturday, 10 August 2019

हैराण झाला होता म्हतारा 
जिंदगीला पुर्णपणे कंटाळून गेला होता
त्यामुळे बिचारा धोतरातील म्हतारा
जिंदगीचा गुन्हेगार झाला होत

 

भिती होती मनात...
हातपाय थरथर कापत होत
रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधार 
म्हतार एकटच थोतर चापत होत

बघत होत म्हतार माझ
धोतराच्या एकुण एक गाठी चापून
ठेवले होते कधीकाळी म्हताऱ्यान
चारपैक त्या थोतराच्या गाठीत लपून

गाठी शोधता शोधता म्हताऱ्याच 
साला थोतारच सुटून गेल
अन् काळोख्या रात्रीत म्हताऱ्याच
क्षणार्धात होत्याच नव्हतं झाल

वैतागून गेल म्हतार त्या जिंदगीला
तिच्याशीच रात्रीची कुस्ती खेळली
भक्कास झालेल्या जिंदगीला मात्र
म्हताऱ्यान आखाड्यात पालथी पाडला 

हैराण झाला होता म्हतारा 
जिंदगीला पुर्णपणे कंटाळून गेला होता
त्यामुळे बिचारा धोतरातील म्हतारा
जिंदगीचा गुन्हेगार झाला होत

जिंदगी जशी माझ्यावर कोपली
तसा म्हतार देखील तिच्यावर कोपला होता
जिंदगीने मला अंधारात आणले
तिच्या सोबतच रातभर एकत्र झोपला होता

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News