स्पीडने बाईक चालवताना हेल्मेटवर पडली वीज; पुढे पाहा काय झालं.!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

दोन दिवसांपासून पावसाने आपला जोर दाखवायला सुरु केली आहे. अचानक आलेल्या या पावामुळे राज्यासह देशात अनेक ठिकाणी यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळत आहे. राज्यात वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना अमेरिकेतील घटनेने खळबळ उडाली आहे.  या घटनेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अमेरिकेतील फ्लोरिडात एक घटना घडली आहे. एक ४५ व्यक्ती हायवेवर स्पीडने बाईक चालवत होता. त्यावेळी अचानक त्याच्या हेल्मेटवर वीज पडली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. या मध्ये वीज पडलेल्या हेल्मेट पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील फोटो ट्विटरवर फ्लोरिडा हायवे पेट्रोलने शेअर केला आहे. 'अचानक ४५ वर्षीय व्यक्तीच्या हेल्मेटवर वीज पडली. तो बाईक चालवत होता. साऊथबाउंड I-95 Volusia County ची घटना आहे. तो वाचू शकला नाही', असं या फोटोवर कॅप्शन देण्यात आलं आहे. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News