शालार्थ प्रणालीच्या कामास वेग; आता राज्यभर शालार्थ प्रणाली

सुहास सदाव्रते
Tuesday, 16 July 2019
  • शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची अद्ययावत माहिती असणारी शालार्थ प्रणाली पथदर्शी जिल्हयात सुरू
  • जालना सातारा आणि ठाणे जिल्हयात प्रणालीच्या कामाने वेग घेतला
  • लवकरच राज्यभर शालार्थ प्रणालीचे काम सुरू होणार

जालना: राज्याच्या शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची अद्ययावत माहिती असणारी शालार्थ प्रणाली पथदर्शी जिल्हयात सुरू झाली आहे. जालना सातारा आणि ठाणे जिल्हयात प्रणालीच्या कामाने वेग घेतला असून लवकरच राज्यभर शालार्थ प्रणालीचे काम सुरू होणार आहे.

राज्य शासनाने सेवार्थ प्रणालीच्या धर्तीवर शिक्षण विभागासाठी शालार्थ प्रणाली सुरू केली होती. परंतु जवळपास दीड वर्षापासून सदर प्रणाली काही तांत्रिकतेमुळे होती. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या (महाआयटी) वतीने पुन्हा नव्याने लवकरच शालार्थ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. राज्यात जालना, सातारा आणि ठाणे जिल्हयात जून महिन्याचे शिक्षक कर्मचारी यांचे वेतन हे नवीन शालार्थ नुसार करण्यात येत आहे.

सदर प्रणालीचे काम पूर्ण झाले आहे. जालना जिल्हयातील अनुदानित, अंशताअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची अद्ययावत माहितीचा डेटा पूर्ण झाला आहे. प्राथमिक विभागाचे वेतन पथक अधीक्षक सुनील पोलास, माध्यमिक विभागाचे वेतन पथक अधीक्षक आव्हाड, शालार्थ प्रणाली राज्य समितीचे सदस्य रूपेश परिहार यांनी शालार्थप्रणालीचे काम मुदतीत पूर्ण केले आहे, हे विशेष. 

या प्रणालीमुळे आता जलद गतीने वेतन पथक कार्यालय व जिल्हा कोषागार कार्यालय यांच्याकडील वेतन देयकांची कामे वेळेत मार्गी लागणार आहेत. जालना नवीन प्रणालीत शिक्षण विभागाची माहिती जी सरल प्रणालीत असून ती आता शालार्थ प्रणालीत घेण्यासाठी आयटी सेलने काम केले आहे. शालार्थ प्रणालीतून शिक्षकांचे वेतन लवकरच ऑनलाईन होणार आहेत. शालार्थ प्रणाली आता एनआयसी पुणे या शासनाच्या महाआयटी मार्फत विकसित करण्यात आली आहे.

शालार्थ प्रणालीच्या कामात जालना जिल्हा पथदर्शी आहे. अनेक अडचणीवर मात करीत प्रणालीचे काम मुदतीत पूर्ण करण्यात आले आहे. जिल्हयातील शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधिक्षक, मुख्याध्यापक व प्राचार्याच्या सहकार्याने वेळेत काम झाले. 
- रूपेश परिहार, शालार्थ, राज्य समिती सदस्य   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News