सुरक्षा रक्षकाच्या मुलीचे नेत्रदीपक यश 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • दहावीत 95 टक्के गुण
  • भविष्यात सी.ए. बनण्याचे स्वप्न

नागपूर : अनेकदा चांगल्या सोयी सुविधा मिळूनही विद्यार्थी मागे पडतात. तर अनेक सुविधांचा अभाव असतानाही काही विद्यार्थी हे यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहचतात. असेच यश साक्षी सोनकुसरेने मिळविले आहे. साक्षीचे वडील तानाजी सोनकुसरे पूर्ती सुपर बाजारमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करतात. मात्र, आपल्या हलाकिच्या परिस्थितीमध्येही साक्षीने दहावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण घेत एक आदर्श उभा केला आहे.
 
साक्षीने वडीलांच्या परिश्रमाचे खर्या अर्थाने चिज केले. साउथ पॉइंट स्कूलची विद्यार्थिनी असलेली साक्षी इयत्ता पाचवी पासूनच हुशार व टॉपर होती. तिला अभ्यासाची आवड असल्याने परिवारानेही तिला तशी दिशा दिली. मात्र, परिवाराची आर्थिक स्थिती फार सुदृढ नसल्याने साक्षीला दहावीमध्ये शिकवणी लावता आली नाही. त्यामुळे स्वत: अभ्यास करूनच साक्षीला हा यशाचा टप्पा गाठावा लागला.

शाळेतील शिक्षकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनातूनच चांगले यश गाठता आले असे साक्षी सांगते. साक्षी पुढे इयत्ता अकरावीमध्ये वाणिज्य शाखेतून प्रवेश घेणार असून भविष्यात तिला सीए बनायचे असल्याचे ती सांगते. साक्षीची आई मेघा सोनकुसरे गृहिणी असून साक्षीच्या या यशात त्यांचाही मोठा वाटा असल्याचे साक्षी सांगते. या यशाबद्दल संस्थेचे संचालक देवेंद्र दस्तुरे, प्राचार्य मृणालीनी दस्तुरे यांनी साक्षी व तिच्या वडीलांचा सत्कार केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News