तुमच्या करिअरचा मार्ग; असं करू शकता एमबीएमधील स्पेशलायझेशन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 31 July 2019

एमबीएच्या भारतीय इतिहासाला साठएक वर्षे पूर्ण होतील. खऱ्या अर्थाने त्यातील मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स, ऑपरेशन्स व फायनान्स या चार मूळ शाखांमध्ये स्पेशलायझेशन केले जाते. पहिल्या वर्षात सर्व बेसिक विषय शिकून झाल्यावर यातील एक विषय मुख्य म्हणून निवडला जाण्याची सर्वच उत्तम संस्थातील पद्धत आहे. काही मोजक्‍या संस्थात एक मुख्य व एक पूरक अशीही पद्धत आहे. काही संस्थांमध्ये ड्युएल म्हणजे दोन विषयांतसुद्धा अजून एखादे वर्ष शिकून पदवी दिली जाते. 

ठोकळमानाने ६५ ते ७० टक्के विद्यार्थी मार्केटिंग या विषयात प्रावीण्य मिळवतात. इंजिनिअर्स सहसा ऑपरेशन्स हा विषय निवडतात. ह्युमन रिसोर्ससाठी मानसशास्त्राची पार्श्‍वभूमी उपयुक्त राहते. फायनान्स या विषयात कॉमर्स, इकॉनॉमिक्‍सचा किमान अभ्यास गरजेचा राहतो. इंग्रजीवर प्रभुत्व व आऊटस्पोकन व्यक्तित्व मार्केटिंगसाठी उपयुक्त ठरते. चारही क्षेत्रांसाठी विश्‍लेषणात्मक वृत्ती हा पाया असतो. 

कोणत्याही संस्थेतून एमबीए केले, तरी पहिला जॉब हा ट्रेनी मॅनेजर म्हणूनच असतो. यशस्वी ट्रेनिंगमधून पार झाल्यावर असिस्टंट, डेप्युटी मॅनेजर वगैरे पदे मिळत जातात. समजा एखादा इंजिनिअर वा कॉमर्स पदवीधर नोकरीला लागल्यास त्याला मॅनेजमेंटमध्ये प्रवेश करायला सात ते दहा वर्षे वाट पाहावी लागते. इथे वयाच्या तेवीस ते पंचवीसचे दरम्यान तुमचा प्रवेश होऊ शकतो. एमबीएचा हा प्रमुख फायदा समजा ना. 

मुख्य विषयातील एमबीएखेरीज गेल्या दशकात विविध विषयांतील एमबीएची पदवी देणारे अभ्यासक्रम काही संस्थांनी सुरू केले आहेत. मात्र या साऱ्यांमध्ये आजही वर दिलेल्या चार प्रमुख विशेषज्ञांचे प्राबल्य कायम आहे. अन्य विषयांची एक छोटी यादीच आपण येथे पाहूयात. एमबीए इन १) आयटी, २) बायोटेक, ३) ॲग्रिकल्चर, ४) ॲग्री मार्केटिंग, ५) टुरिझम अँड ट्रॅव्हल्स, ६) हेल्थकेअर, ७) हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन्स, ८) गव्हर्नन्स, ९) फॉरेन ट्रेड, १०) इंटरनॅशनल बिझनेस. 

ही अशी यादी येत्या दशकात दुप्पटसुद्धा होऊ शकते, मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील एका क्षेत्रातील एमबीए व्यक्ती दुसऱ्या क्षेत्रात क्वचितच जाऊ शकेल. याउलट मूळ चार विषयांतील मॅनेजरच यांचे खरे बॉसेस असतात व ते यातील कोणत्याही कंपनीत काम करू शकतात. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News