फुटबॉलशौकिनांसाठी आज विशेष मेजवानी

जयेश सावंत (यिनबझ)
Sunday, 7 July 2019

रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस! क्रिकेट विश्वचषकाच्या साखळी सामन्यांचा आता समारोप होणार असून लवकरच उपांत्य फेरीचे सामने सुरु होणार आहेत. तसेच फुटबॉलचाही यावर्षीचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचला असून, आज एक दोन नव्हे तर चक्क ८ आंतरार्ष्ट्रीय सामन्यांचा आस्वाद आज फुटबॉलप्रेमींना घेता येणार आहे. 

रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस! क्रिकेट विश्वचषकाच्या साखळी सामन्यांचा आता समारोप होणार असून लवकरच उपांत्य फेरीचे सामने सुरु होणार आहेत. तसेच फुटबॉलचाही यावर्षीचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचला असून, आज एक दोन नव्हे तर चक्क ८ आंतरार्ष्ट्रीय सामन्यांचा आस्वाद आज फुटबॉलप्रेमींना घेता येणार आहे. 

आज पहिली लढत भारतीय फुटबॉल संघाची असून भारत आज अह्मदाबादेतील ट्रान्सस्टेडिया मैदानावर तजाकिस्तान सोबत इंटर-कॉन्टिनेन्टल चषकात सलामीच्या सामन्यात  दोन हात करणार असून, भारताच्या नवीन प्रशिक्षकांसोबतच भारताचे नव्या दमाचे फुटबॉलपटू कशी कामगिरी करतील यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच गुजरातमधील फुटबॉलशौकिनांना या लढतीचा आनंद प्रत्यक्ष उचलता येणार असून या लढतीचे तिकीट फक्त १००/- रुपयेच आहे. सध्यस्थितीत भारत जागतिक फुटबॉल क्रमवारीत १०१ व्या स्थानावर असून या सामन्यांमधील निकालामुळे भारताला पहिल्या १०० देशांमध्ये स्थान मिळविण्याची सुवर्णसंधी आहे. 

दुसऱ्या सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर महिलांच्या फुटबॉल विश्वचषकाची अंतिम लढत आज रंगणार असून अमेरिका आणि नेदरलँड्स आमने सामने उभे राहणार आहेत. अमेरिकेने उपांत्य लढतीत बलाढ्य इंग्लंडचा २-१ ने पराभव करून अंतिम फेरी गाठली तर नेदरलँड्सने स्वीडनचे कडवे आव्हान १-० ने पछाडले. अंतिम लढतीत अमेरिकेची स्टार फुटबॉलपटू अॅलेक्स मॉर्गनच्या कामगिरीकडे सर्व फुटबॉल जगताचे लक्ष लागून आहे हे मात्र नक्की!

तसेच दक्षिण अमेरिका खंडाच्या देशांमध्ये रंगणाऱ्या कोपा अमेरिका स्पर्धेची अंतिम लढत ब्राझील व पेरू या संघांमध्ये लढणार असून सुपरस्टार नेयमारच्या अनुपस्थित खेळणाऱ्या ब्राझीलने लिओनेल मेस्सीच्या अर्जेन्टिनाचा २-० ने पराभव करून अंतिम फेरी गाठली तर त्यांचे प्रतिस्पर्धी पेरू यांची कामगिरी या स्पर्धेत वाखाणण्याजोगी होती, पेरूने आपल्यापेक्षा बलाढ्य चिली संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता ब्राझीलविरुद्ध पेरूची कामगिरी कशी असेल याची उत्सुकता फुटबॉलप्रेमींना असेल. तसेच उपांत्य फेरीत हरलेले अर्जेन्टिना व चिली या संघांचा तिसऱ्या क्रमांकासाठी सामना होणार असून चिली पुन्हा अर्जेन्टिनाला निराश करणार का हा मोठा प्रश्न आहे.

फुटबॉल लढती सुरु असताना अमेरिका खंड कसा मागे राहील? अमेरिका खंडातही उत्तर-अमेरिका मधील देश, मध्य-अमेरिका यातील देश आणि कॅरेबियन बेटांतील देशाचा समावेश असलेल्या गोल्डस कपची सुद्धा अंतिम लढत रविवारी रंगणार आहे. या खंडातील २ बलाढ्य संघ मेक्सिको आणि खुद्द अमेरिका एकमेकांसमोर अंतिम लढतीत उभे ठाकणार असून अमेरिकेचा आणि फुटबॉल जगतातील  भविष्यातला सुपरस्टार म्हणून पाहल्या जाणाऱ्या क्रिस्तिआन पुलिसिक तसेच मेक्सिकोच्या जॅव्हिअर 'चिचारीतो' हॅर्नांदेझ मधील हे फुटबॉल युद्ध पाहण्यासारखे असेल. गोल्डस कपच्या उपांत्य लढतीत हरलेल्या जमैका व हैती यांचा तिसऱ्या क्रमांकासाठी सामना होईल. 

आफ्रिका खंडातही आफ्रिका कप ऑफ नेशन्स या स्पर्धेत आफ्रिकेतील सर्व देश सहभागी झाले आहेत. साखळी लढतीचा ओघ आता उसाला असून बाद फेरीच्या लढतीचा आनंद उचलण्यासाठी प्रेक्षकवर्ग तय्यार झाला आहे. येत्या रविवारी लिव्हरपूलच्या मोह्हमद  सलाहच्या इजिप्तची लढत दक्षिण आफ्रिकेची रंगणार असून आपल्या फुटबॉलच्या खेळाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सलाह च्या कामगिरीवर खास लक्ष असेल. दुसऱ्या लढतीत मादागास्कर ची लढत DR कॉंगो  सोबत असेल. 

या सर्व लढतींसोबत इतर खेळांच्या अपडेट्ससाठी यिनबझच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या.  

   

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News