जय लवकरच पाजी स्टाइलमध्ये

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019

‘जैगुआर वाली कुडी’ असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्यात त्याच्यासोबत अभिनेत्री चांदणीदेखील झळकणार आहे.

हे एक पंजाबी गाणं असून गायक अंकित राजपूत आणि सॅंडी यांनी हे गाणं गायले आहे.

या गाण्यात तो स्टाईलिश अंदाजात दिसणार आहे.

अभिनेता जय भानुशालीने ‘हेट स्टोरी-२’, ‘एक पहेली लीला’ यांसारख्या चित्रपटांत काम केले.

तसेच यापूर्वी त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर अनेक रिॲलिटी शोचेदेखील सूत्रसंचालन करत त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता लवकरच तो एका रोमॅंटिक गाण्यातून प्रेक्षकांसमोर येतोय.

‘जैगुआर वाली कुडी’ असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्यात त्याच्यासोबत अभिनेत्री चांदणीदेखील झळकणार आहे. हे एक पंजाबी गाणं असून गायक अंकित राजपूत आणि सॅंडी यांनी हे गाणं गायले आहे. या गाण्यात तो स्टाईलिश अंदाजात दिसणार आहे. या गाण्यामधील जयचा पंजाबी स्वॅग त्याच्या चाहत्यांना कितपत आवडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News