सोनिया गांधींची राजकारणाची सेकंड इनिंग्स सुरु

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019
  • महाराष्ट्रातील नेत्यांबरोबर विधानसभा निवडणुकीची चर्चा
  • हरियानाबाबत उद्या बैठक

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नवनिर्वाचित हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सोनिया गांधी ‘ॲक्‍शन मोड’ मध्ये आल्या आहेत.

विधानसभा निवडणूक होणाऱ्या राज्यांवर लक्ष केंद्रित करताना त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. हरियानातील काँग्रेस नेत्यांमध्ये पेटलेला कलह आणि झारखंडमध्ये नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्तीचे आव्हान या पार्श्‍वभूमीवर दोन्ही राज्यांमधील नेत्यांनाही सोनिया पाचारण करतील, असे सांगितले जाते. 

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह नितीन राऊत, बसवराज पाटील, यशोमती ठाकूर, मुजफ्फर हुसेन या कार्याध्यक्षांनी आज ‘१० जनपथ’ या निवासस्थानी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपालही या वेळी उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतरची सोनिया गांधींची ही पहिलीच राजकीय भेट होती. महाराष्ट्रातील पूरस्थितीची माहिती सोनियांना दिल्याचे थोरात यांनी सांगितले. पाच कार्याध्यक्षांपैकी एक विश्‍वजित कदम हे स्थानिक पूरस्थितीमुळे दिल्लीत येऊ शकले नाहीत, तर सोनिया गांधींकडे प्रदेश नेत्यांनी भेटीची आधीच वेळ मागीतली होती, असे राऊत यांनी सांगितले.

हरियानाबाबत उद्या बैठक
हरियाना आणि झारखंडमध्येही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. हरियानातील हुडा यांनी पुकारलेले बंड आणि पुढील राजकीय वाटचाल ठरविण्यासाठी रविवारी बोलावलेली बैठक निर्णायक ठरणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News