सोनल-अभिजीतचे रोमॅंटिक गाणे प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 September 2019
  • ‘पाहिलं तुला’ असे या गाण्याचे नाव असून हे गाणे रोमॅंटिक असणार आहे. या गाण्याचे दिग्दर्शन रूपेश पावसकर यांनी केले आहे.

‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्री सोनल पवारने ‘घाडगे ॲण्ड सून’ या मालिकेतील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच ‘टकाटक’ या चित्रपटातून अभिनेता अभिजीत आमकरने आपले अभिनयकौशल्य दाखवले.

आता लवकरच सोनल आणि अभिजीत प्रथमच एका गाण्यातून एकत्र येणार आहेत. ‘पाहिलं तुला’ असे या गाण्याचे नाव असून हे गाणे रोमॅंटिक असणार आहे. या गाण्याचे दिग्दर्शन रूपेश पावसकर यांनी केले आहे. व्हिडीओ पॅलेस प्रस्तुत हे गाणे गायक रोहित ननावरेने गायले आहे.

या गाण्यात सोनल-अभिजीतचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळणार आहेत. खरं तर दोघांना या गाण्यात एकत्र पाहायला प्रेक्षकही फार उत्सुक आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News