आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाची राज्यपालांकडे इच्छा मरणाची मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 19 November 2019

दुष्काळामुळे होणारे शेतीतले मोठे नुकसान आणि कुटुंबाचा खर्च या सगळ्याला कंटाळून वडिलांनी आत्महत्या केली, याआधीच आईनेही आपला प्राण सोडला असल्याने आता घराला सांभाळणारं कोणी नाही, त्यामुळे इच्छा मरणाची परवाणी द्यावी यासाठी बीड येथील पवन गिते या तरुणाने राज्यपालांना पत्र लिहले आहे. 

दुष्काळामुळे होणारे शेतीतले मोठे नुकसान आणि कुटुंबाचा खर्च या सगळ्याला कंटाळून वडिलांनी आत्महत्या केली, याआधीच आईनेही आपला प्राण सोडला असल्याने आता घराला सांभाळणारं कोणी नाही, त्यामुळे इच्छा मरणाची परवाणी द्यावी यासाठी बीड येथील पवन गिते या तरुणाने राज्यपालांना पत्र लिहले आहे. 

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गितेवाडी या ठिकाणी राहाणारा पवन संजय गिते याने इच्छामरणास परवानगी मिळण्यासाठीचा अर्ज राज्यपालांना पाठवला आहे. राज्यात कोणतेही सरकार नसल्याने सर्व अधिकार हे राज्यपालांच्या हाती आहेत, त्या अधिकारांच्या जोरावर एक तर शेतकऱ्याला न्याय द्यावा नाहीतर इच्छा मरणासाठी परवणागी द्यावी असे मत पवन गिते यांनी मांडलं आहे.

पवन यांची आई तीर्थरूप आशाबाई सण २०१६ रोजी दुर्धर आजाराने मृत पावल्या, त्यानंतर वडील संजय महादेव गिते यांनी सततचा दुष्काळ, नापिकी, विविध समस्या याला कंटाळून ०२ ऑगस्ट २०१९ रोजी गावठी दारू व त्यासोबत काही विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली. आई वडिलांच्या निधनानंतर मागे तीन भावंडे व एक वयोवृद्ध आजारी आज्जी असा परिवार असा पवनचा आहे. 

पवनन सध्या इयत्ता १२ वी विज्ञानला शिकत असून, त्याचा मोठा भाऊ प्रविण हा अध्यात्मिक पदवीला आहे, तर लहान भाऊ प्रदीप हा ६ वी वर्गात आहे. तीन भावंडांचा सगळ्यां शिक्षणाचा खर्च, आज्जीच्या आजारपणाचा खर्च करणे व उघड्यावर पडलेल्या कुटुंबाचा गाडा चालवणे मुश्किल होत आहे. सततचा दुष्काळ, नापिकी, निसर्गाच्या लहरीपणामुळे आहे, त्यामुळे 3 एक्कर शेती तोट्यात गेली आहे. अनेकदा शेती पिकत नाही अन् पिकलेलं योग्य भावात विकत नाही. शेती हा व्यवसाय जुगार बनला असून अनेकदा केलेला खर्चही वसुल होत नाही. असं दुर्दैवी जीवन जगताना होणाऱ्या वेदना मनाला असह्य होत आहेत. आता आपणच अधिकृत शासकीय यंत्रणे मार्फत याची सत्यता पडताळावी व या सगळ्यांतून बाहेर पडण्यासाठी मला शासनाकडून काही आर्थिक मदत/ रोजगार मिळावा. अन्यथा मला इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती संजय गिते यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News