कभी कभी कुछ रिश्तोंसे बाहर आ जाना ही... संजय राऊत

यिनबझ टीम
Friday, 22 November 2019

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद आणि त्यांच्याकडून केले जाणारे अनेक प्रकारचे ट्वीट सत्ता स्थापनेत काहीतरी नवा ट्विस्ट घेऊन येताना दिसतात, त्यातच आज संजय राऊत यांनी एक नवं ट्विट करत भाजपला मॅसेज दिल्याचे समजत आहे.

मुंबई - गेल्या 3 आठवड्यापासून सत्ता स्थापनेचा पेच सुरू असताना त्यावर आता मोठ्या हालचाली होताना दिसत आहेत. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद आणि त्यांच्याकडून केले जाणारे अनेक प्रकारचे ट्वीट सत्ता स्थापनेत काहीतरी नवा ट्विस्ट घेऊन येताना दिसतात, त्यातच आज संजय राऊत यांनी एक नवं ट्विट करत भाजपला मॅसेज दिल्याचे समजत आहे.

कभी कभी कुछ रिश्तोंसे बाहर आ जाना ही अच्छा होता है | अहंकार के लिये नही... स्वाभिमान के लिये! अशाप्रकारचे ट्विट करत संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सत्ता स्थापनेवर एक नवीन पदडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या काही दिवसापासून शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सत्ता स्थापनेला घेऊन खलबतं सुरू असताना भाजपाने मात्र शिवसेना परत येण्याची वेट अॅंड वॉचची भुमिका ठेवली होती, आता त्या भातप तसचे एनडीएच्या सरकारमधून शिवसेनेने अधिकृतरित्या बाहेर पडल्याचे हे इशारे असतील का, असाही दावा या ट्विटरच्या माध्यमातून केला जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News