कधी कधी रात्री 

प्रविण पवार, धुळे
Saturday, 26 January 2019

कधी कधी रात्री 
स्वप्नांपेक्षा प्रश्नच अधिक पडू लागतात 
मग सुचू लागतं काहीमाही 
अक्षरं आपोआपच वळू लागतात
लोकं म्हणतात-
'ही कविता आहे दुःखाची' 
पण मी म्हणतो-
'माझं तर दुःखच कविता आहे' 
हल्ली माझी कविता 
कुठल्याच स्पर्धेत टिकत नाही 
खरंतर मलाच माझं दुःख 
शब्दांत फुलवता जमत नाही 
पारस्याॅलिटी झाली
का व्यथा कमी पडल्या? 
परिक्षकांनाच माहित
रक्त जळलं की घाम सुकला? 
समीक्षकांनाच माहित
पण, कधी तरी कळेल जगाला 
माझं एकांत दुखणं 
तेव्हा माझी कविता व्यासपीठावर नसेल 

कधी कधी रात्री 
स्वप्नांपेक्षा प्रश्नच अधिक पडू लागतात 
मग सुचू लागतं काहीमाही 
अक्षरं आपोआपच वळू लागतात
लोकं म्हणतात-
'ही कविता आहे दुःखाची' 
पण मी म्हणतो-
'माझं तर दुःखच कविता आहे' 
हल्ली माझी कविता 
कुठल्याच स्पर्धेत टिकत नाही 
खरंतर मलाच माझं दुःख 
शब्दांत फुलवता जमत नाही 
पारस्याॅलिटी झाली
का व्यथा कमी पडल्या? 
परिक्षकांनाच माहित
रक्त जळलं की घाम सुकला? 
समीक्षकांनाच माहित
पण, कधी तरी कळेल जगाला 
माझं एकांत दुखणं 
तेव्हा माझी कविता व्यासपीठावर नसेल 
नसतील शब्द माझे पाठ्यपुस्तकात 
पण, ती असेल एखाद्या उकिरड्यावर 
भुकेल्यांसाठी भाकरी शोधत
किडलेल्या वस्तीत 
दंग्यात वाहणार्या रक्तात
बेरोजगार भुमित 
आणि देहविक्री करणार्या काळ अंधारात 
मरून पडलेली....!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News